Join us  

CNG-PNG Price : स्वत: संकटात अडकलेल्या अदानींचा १० लाख ग्राहकांना दिलासा, कमी केले सीएनजी-पीएनजीचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 11:36 AM

अदानींनी सामान्यांना दिलासा दिला असून सीएनजी-पीएनजीचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

CNG-PNG Price Adani Total Gas : घरं आणि वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत कपात सुरू झाली आहे. सीएनजी-पीएनजीच्या नवीन किमती निश्चित करण्यासाठी सरकारनं नवीन फॉर्म्युला मंजूर केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती १० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत. शुक्रवारी नवीन दराच्या सूत्राला मंजुरी दिल्यानंतर महानगर गॅसनं आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आणि आता अदानी गॅसनेही दरात कपात केली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेडन (Adani Total Gas Limited) त्यांच्या १० लाख ग्राहकांना दिलासा दिला आहे.

खुशखबर! महानगर गॅसकडून CNG च्या किमतीत ८, तर PNG च्या किंमतीत ५ रुपयांची कपात; जाणून घ्या मुंबईतील लेटेस्ट रेट

अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने CNG-PNG च्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. अदानी टोटलनं सीएनजीच्या किमतीत ८.१३ रुपये प्रति किलो आणि पीएनजीच्या किमतीत ५.०६ रुपये प्रति एससीएमचची कपात केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आलेत. केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दराचं नवं सूत्र जाहीर केल्यानंतर अदानींकडून काही तासांतच सीएनजी-पीएनजीचे दर कमी करण्यात आलेत.

१० लाख ग्राहकांना फायदाअदानी टोटलनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार त्यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा अदानी टोटल गॅसच्या ग्राहकांना मिळणार आहे. ७ लाख घरांना पीएनजीच्या दरात कपातीचा लाभ मिळणार असून ३ लाख ग्राहकांना दररोज सीएनजीच्या दरात कपातीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती. महानगर गॅस लिमिटेडने शुक्रवारी रात्री मुंबईत सीएनजीच्या दरात ८ रुपयांनी आणि पीएनजीच्या दरात ५ रुपयांची कपात केली.

टॅग्स :अदानीव्यवसाय