Nirmala Sitharaman : देशातील वाढत्या महागाईचा फटका समाजातील प्रत्येक घटकाला बसतोय. या वाडत्या महागाईच्या युगात सरकारकडून दिलासा मिळावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. अशातच, महागाईच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर एका युजरने केलेल्या पोस्टवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
युजरने मागितली मदत
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर, तुषार नावाच्या युजरने अर्थमंत्र्यांना टॅग करत एक पोस्ट केली. त्याने लिहिले की, सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. मात्र, वाढत्या महागाईने मध्यमवर्गीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. मी अर्थमंत्र्यांना नम्रपणे विनंती करतो की, त्यांनी मध्यमवर्गीयांना थोडा दिलासा द्यावा. हे सरकारसाठी नक्कीच आव्हानात्मक आहे, परंतु कृपया याचा विचार करा.
Thank you for your kind words and your understanding. I recognise and appreciate your concern.
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) November 17, 2024
PM @narendramodi ‘s government is a responsive government. Listens and attends to people’s voices. Thanks once again for your understanding. Your input is valuable. https://t.co/0C2wzaQtYx
अर्थमंत्र्यांनी दिले हे उत्तर..
या पोस्टला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, तुमच्या समजुती आणि कौतुकाबद्दल मी आभारी आहे. मला तुमची महागाईबद्दलची चिंता समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे एक जबाबदार सरकार आहे, जे लोकांचे ऐकते आणि त्यांच्याकडे लक्ष देते. तुमचे इनपुट आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
अर्थमंत्र्यांचे हे उत्तर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. आतापर्यंत 1.4 हजारांहून अधिक युजर्सनी या पोस्टला लाईक केले आहे आणि 300 हून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. अनेक युजर्सनी अर्थमंत्र्यांच्या या पावलाचे कौतुक केले असून, मध्यमवर्गीयांच्या समस्या समजून घेण्यासाठी सरकारने या दिशेने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.