Join us

गतवर्षीच्या दुष्काळासाठी उर्वरित ४०२ कोटींचे वाटप

By admin | Published: July 14, 2015 2:28 AM

गतवर्षीच्या खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे राज्यात सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. तांत्रिक कारणास्तव गेल्या आर्थिक वर्षात काही बाधित शेतकऱ्यांना निधी

- गजानन मोहोड,  अमरावतीगतवर्षीच्या खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे राज्यात सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. तांत्रिक कारणास्तव गेल्या आर्थिक वर्षात काही बाधित शेतकऱ्यांना निधी वितरित झाला नाही. हा उर्वरित ४०२ कोटी ७३ लाखांचा निधी अलीकडेच वितरित करण्यात आला आहे. राज्यातील पाच विभागांतील २६ जिल्ह्यांत दुष्काळासाठी ४८०३.९ कोटींच्या निधीची आवश्यकता होती. शासनाने पहिल्या टप्प्यात ७ जानेवारी रोजी २००० कोटी व दुसऱ्या टप्प्यात २००० कोटींचे वाटप केले होते. उर्वरित ८०३ कोटी ९ लाख रुपयांच्या निधीपैकी ४०२ कोटींचा निधी ८ जुलै रोजी वितरित करण्यात आला.राज्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवेळी पाऊस व गारपिटीमुळे रबी हंगामातील गहू व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १३ एप्रिल रोजी शासनाने अवकाळीच्या नुकसानीबाबत ४८१ कोटींपैकी २०० कोटींची मदत राज्यातील सर्व जिल्ह्यांना केली होती. ५० टक्क्यांवर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राला मदतीसाठी हा निधी देण्यात आला होता. उर्वरित २८१ कोटींचा निधी शासनाने गत ८ जुलै रोजी वितरित केला.विभागनिहाय निधी वाटपकोकण - ९८ कोटी ४७ हजार रुपयेनाशिक - ११३ कोटी ५४ लाख रुपयेपुणे - १७ कोटी ३७ लाख रुपयेऔरंगाबाद - ४९ कोटी ४ लाख रुपयेअमरावती - २९ कोटी ९५ लाख रुपयेनागपूर - १७ कोटी ४७ लाख रुपयेग़- कुटुंबातील कर्ता व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास त्याच्या वारसाला २ लाख ५० हजार मदत दिली जाणार आहे. मोठे जनावर मृत झाल्यास एक मर्यादेपर्यंत मालकास २५ हजार, मध्यम जनावरे, दोन मर्यादेपर्यंत १० हजार, लहान जनावरे दोन मर्यादेपर्यंत ५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. पूर्णत: उद्ध्वस्त झालेल्या घरास ७० हजार रुपये मिळणार आहेत.