Lokmat Money > बिझनेस न्यूज > जागेच्या कमतरतेवर ‘पोटमाळ्या’चा उपाय

जागेच्या कमतरतेवर ‘पोटमाळ्या’चा उपाय

मुंबईसारख्या महानगरात जागेची कमतरता असते. यामुळेच कमी जागेचा निवासासाठी पुरेपूर उपयोग करणारी युरोपियन आर्किटेक्चरसारखी आगळी ‘पोटमाळे’ प्रकारची बांधकाम संस्कृती आता येत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:58 AM2018-05-02T01:58:40+5:302018-05-02T01:58:40+5:30

मुंबईसारख्या महानगरात जागेची कमतरता असते. यामुळेच कमी जागेचा निवासासाठी पुरेपूर उपयोग करणारी युरोपियन आर्किटेक्चरसारखी आगळी ‘पोटमाळे’ प्रकारची बांधकाम संस्कृती आता येत आहे.

Remedies for 'stomach' on the scarcity of space | जागेच्या कमतरतेवर ‘पोटमाळ्या’चा उपाय

जागेच्या कमतरतेवर ‘पोटमाळ्या’चा उपाय

मुंबई : मुंबईसारख्या महानगरात जागेची कमतरता असते. यामुळेच कमी जागेचा निवासासाठी पुरेपूर उपयोग करणारी युरोपियन आर्किटेक्चरसारखी आगळी ‘पोटमाळे’ प्रकारची बांधकाम संस्कृती आता येत आहे.
बांधकामासाठी उपलब्ध असलेली कमी जागा, त्यात जागेच्या वाढत्या किमती यामुळे दिवसेंदिवस निवासी फ्लॅट लहान होत आहेत. एका छोट्या कुटुंबालाही राहण्यासाठी किमान एक बेडरूम व पाहुणे आल्यास किंवा घरी मोठी मुले असल्यास त्यांच्यासाठी आणखी एका छोट्या खोलीची गरज असते. जेमतेम २७०, ३२०, ३५०, ३८० चौरस फुटांच्या चटई क्षेत्रात अशी अतिरिक्त खोली उभी होणे अशक्य असते. मात्र खोलीवर खोली किंवा छोटी जागा उभी करणे शक्य आहे. अशी जागा पूर्वी ‘पोटमाळा’ रूपात गावांमधील घरांत असायची. आता अशा जागेचे आधुनिक रूप युरोपियन आर्किटेक्चरमध्ये सापडते. हे आर्किटेक्चर ग्रुप सॅटेलाइट या बांधकाम कंपनीने आणले असून, अवघ्या २४७ चौरस फुटांच्या बांधकामात दोन बेडरूमचा आनंद ग्राहकांना मिळू शकतो. स्वयंपाकघराच्या वर असा ‘पोटमाळा’ तयार करण्यात आल्याने तेथील ७० चौरस फूट क्षेत्रफळाची व पाच फूट उंच जागा दुसऱ्या बेडरूमच्या रूपात वापरता येऊ शकते. या पोटमाळ्यावर जाण्यासाठी जिनाही आहे.
जुने बांधकाम न पाडता त्याला आधुनिक रूप देण्यासाठी युरोपात असे आर्किटेक्चर करण्यात आले आहे. पण मुंबईसारख्या शहराचीसुद्धा ही गरज ठरत आहे.

Web Title: Remedies for 'stomach' on the scarcity of space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.