अोला : शहरातील नागरिकांच्या समस्या न सोडविता त्या आकसपोटी प्रलंबित ठेवण्याचे काम महापालिका प्रशासन चोख बजावत असल्याचा प्रकार बिर्ला रोडस्थित रामदूत अपार्टमेंटमधील रहिवाशांना अनुभवास आला. मनपातील एका मानसेवी महिला कर्मचार्याने रस्त्याच्या मधोमध थाटलेले अतिक्रमण न काढता उलट पाणीपी थकीत असल्याची सबब पुढे करीत मनपाने रामदूत अपार्टमेंटमधील रहिवाशांनाच दंड ठोठावल्याचा प्रकार २८ सप्टेंबर रोजी घडला. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कार्यालयात मानधन तत्त्वावर सेवा बजावणार्या एका महिला कर्मचार्याने बिर्ला रोडस्थित रामदूत अपार्टमेंटच्या समोर चक्क रस्त्याच्या मधोमध घर उभारले. आयुक्तांनी अकोलेकरांना अतिक्रमणमुक्त करण्याचे स्वप्न दाखवत विविध भागात तोडफोडीला सुरुवात केली. रस्त्यालगत दुकान मांडणार्या अतिक्रमकांना हुसकावून लावले. सहाजिकच, प्रशासनाची भूमिका लक्षात घेता, अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी न्याय मिळण्याच्या अपेक्षेने आयुक्तांकडे तक्रारी केल्या; परंतु झाले नेमके उलटेच, ज्या मार्गावरून फोर-जीचे फायबर ऑप्टीक केबल टाकल्या जाईल, त्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याला प्रशासनाला प्राधान्य दिले. तर अतिक्रमणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांना झुलवत ठेवण्याचे काम सुरू आहे. रामदूत अपार्टमेंटमधील नागरिकांनी ऑगस्ट महिन्यात तक्रार केल्यावर प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. वृत्तपत्रामधून कर्तव्याचा बुरखा टराटरा फाटताच, पित्त खवळलेल्या अधिकार्यांनी २८ सप्टेंबर रोजी रामदूत अपार्टमेंटमधील नागरिकांच्या समस्येला प्राधान्य न देता, थकीत पाणीपी व एकाच नळ कनेक्शनवरून सात ते आठ रहिवासी पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे प्रत्येकाला चार-चार हजार रुपयांचा दंड ठोठावला. एका नळ जोडणीवरून संपूर्ण अपार्टमेंट पाण्याचा उपसा करीत असल्याची बाब निश्चितच योग्य नाही; परंतु अतिक्रमणाची तक्रार दोन महिन्यांपूर्वी करूनसुद्धा या नागरिकांची समस्या कायम ठेवल्याने वरिष्ठ अधिकारी आकस व द्वेषभावनेतून कारवाई करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. बॉक्स...म्हणे १०० क्रमांक डायल कराअतिक्रमित घरामुळे प्रचंड कुचंबणा होत असून मनपाच्या कारवाईला विलंब होत असल्याने काही युवक शिवीगाळ व धमक्या देत असल्याची बाब रामदूत अपार्टमेंटमधील रहिवाशांनी आयुक्त डॉ.कल्याणकर व उपायुक्त चिंचोलीकर यांना सांगितली. समस्येचे निराकरण न करता, उपायुक्तांनी रहिवाशांना १०० क्रमांक डायल करून पोलिसांना सूचना देण्याचा अजब सल्ला देत, नागरिकांचे म्हणणे उडवून लावले.
अतिक्रमणाची तक्रार कराल तर याद राखा! चोर सोडून संन्याशाला फाशी; मनपाचा प्रताप
अकोला : शहरातील नागरिकांच्या समस्या न सोडविता त्या आकसपोटी प्रलंबित ठेवण्याचे काम महापालिका प्रशासन चोख बजावत असल्याचा प्रकार बिर्ला रोडस्थित रामदूत अपार्टमेंटमधील रहिवाशांना अनुभवास आला. मनपातील एका मानसेवी महिला कर्मचार्याने रस्त्याच्या मधोमध थाटलेले अतिक्रमण न काढता उलट पाणीपी थकीत असल्याची सबब पुढे करीत मनपाने रामदूत अपार्टमेंटमधील रहिवाशांनाच दंड ठोठावल्याचा प्रकार २८ सप्टेंबर रोजी घडला.
By admin | Published: September 29, 2014 09:46 PM2014-09-29T21:46:44+5:302014-09-29T21:46:44+5:30