Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑनलाइन शॉपिंग करताय? मग फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी वाचा...

ऑनलाइन शॉपिंग करताय? मग फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी वाचा...

Online Shopping : ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही सीओडी म्हणजेच कॅश ऑन डिलीव्हरी पर्याय वापरू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 03:34 PM2020-10-12T15:34:55+5:302020-10-12T15:38:22+5:30

Online Shopping : ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही सीओडी म्हणजेच कॅश ऑन डिलीव्हरी पर्याय वापरू शकता.

remember these things in mind while shopping during festive season sale you will not trap in online fraud | ऑनलाइन शॉपिंग करताय? मग फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी वाचा...

ऑनलाइन शॉपिंग करताय? मग फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी वाचा...

Highlightsबहुतेक लोक शॉपिंग साइटवर आपल्या एटीएम कार्डची माहिती सेव्ह करतात, मात्र तुम्ही अशी चूक करू नका.

नवी दिल्ली : देशात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. यानिमित्ताने ऑनलाइन शॉपिंग साइट्ससह अनेक टेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी येत्या काही दिवसांत सेलचे आयोजन करत आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टपासून ते  घरातील सर्व उपकरणांवर चांगली ऑफर दिल्या जाणार आहेत. 

अशा परिस्थितीत, तुम्ही देखील या फेस्टिव्ह सेलदरम्यान शॉपिंग करण्याचा विचार करत असाल, तर काळजीपूर्वक शॉपिंग करावी लागेल. कारण, तुमची ऑनलाइन फसवणूक होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या शॉपिंग टिप्स देत आहोत. चला जाणून घेऊया...

कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय सर्वात सुरक्षित
ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही सीओडी म्हणजेच कॅश ऑन डिलीव्हरी पर्याय वापरू शकता. यामध्ये, शॉपिंग केलेली वस्तू प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यानंतर तुम्ही त्या वस्तूचे पैसे देऊ शकता.

एटीएम कार्डची माहिती शॉपिंग साइटवर सेव्ह करू नका
बहुतेक लोक शॉपिंग साइटवर आपल्या एटीएम कार्डची माहिती सेव्ह करतात, मात्र तुम्ही अशी चूक करू नका. ऑनलाइन पेमेंट करताना save card details च्या पर्यायवर नो क्लिक करा. यानंतरच पेमेंट करा. यामुळे तुमचे बँक खाते पूर्णपणे सुरक्षित राहील.

वेबसाइटची URL आवश्य तपासा
वेबसाइटची URL आवश्य तपासून पाहा. त्याठिकाणी HTTP ऐवजी HTTPS असले पाहिजे. शेवटी, एस म्हणजे Google ने ती सिक्योर्ड केली आहे. यामुळे तुमची फसवणूक होण्यापासून वाचू शकाल. तुमचे बँक खाते देखील सुरक्षित राहील.

बनावट वेबसाइटपासून सावध व्हा
सध्या हॅकर्स बनावट वेबसाइट्स किंवा मोबाईल अ‍ॅप्स बनवून लोकांना लक्ष्य करीत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही साइट किंवा अॅपवर खरेदी करण्यापूर्वी याबद्दल संपूर्ण माहिती मिळवा. त्यामुळे तुमची ऑनलाइन फसवणूक होणार नाही.

Web Title: remember these things in mind while shopping during festive season sale you will not trap in online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.