Lokmat Money > बिझनेस न्यूज > विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय भांडवल बाजार त्रस्त

विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय भांडवल बाजार त्रस्त

विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय भांडवल बाजारातून ८,३१९ कोटी रुपये काढून घेतले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 04:31 AM2019-08-19T04:31:44+5:302019-08-19T04:31:53+5:30

विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय भांडवल बाजारातून ८,३१९ कोटी रुपये काढून घेतले आहेत.

The removable footing of foreign investors, the Indian capital markets suffer | विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय भांडवल बाजार त्रस्त

विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय भांडवल बाजार त्रस्त

नवी दिल्ली : विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय भांडवल बाजारातून ८,३१९ कोटी रुपये काढून घेतले आहेत. भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणुकीवरील कर आणि जागतिक व्यापाराबद्दलच्या काळजीच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांचे भाग विकण्याचा क्रम सुरूच ठेवला आहे.
डिपॉझिटोरी डाटाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी एक ते १६ आॅगस्ट कालावधीत नेट बेसिसवर १०,४१६.२५ कोटी रुपयांचे भाग विकून टाकले. तथापि, याच कालावधीत निव्वळ २,०९६.३८ कोटी रुपयांची गुंतवणूक कर्ज सिक्युरिटीजमध्ये झाली. आॅगस्ट महिन्यात देवाण-घेवाणीच्या दहा सत्रांपैकी नऊमध्ये एफपीआयनी फक्त विक्री केली व यातून कमालीची नकारात्मक भावनाच दिसते, असे मॉर्निंगस्टारमध्ये वरिष्ठ विश्लेषक व्यवस्थापक असलेले हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले. गेल्या जुलै महिन्यात एफपीआयजनी भारतीय भांडवल बाजारातून (भाग आणि कर्ज) २,९८५.८८ कोटी रुपये काढून घेतले होते. एफपीआयवरील जास्तीच्या करामुळे विदेशी गुंतवणूकदारांवर नकारात्मकतेचा प्रभाव पडला आहे. ते सुपर रीच (हायर सरचार्ज) कर पाच जुलै रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झाल्यापासून भारतीय भाग बाजारातून बाहेर पडत आहेत, असे श्रीवास्तव म्हणाले. याशिवाय देशातील आणि जागतिक मिश्र अहितकारक घटकांनीही विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या जुलै आणि आॅगस्ट महिन्यात भारतीय भाग बाजारातून बाहेर पडण्यास हातभार लावला आहे.

अमेरिकेच्या व्यापारयुद्धामुळेही तणाव
भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडीही मंदावल्या आणि पाऊसही जून महिन्यात सरासरीच्या ४३ टक्के कमी झाल्यामुळे परिस्थिती आणखी काळजीची बनवली. तज्ज्ञांच्या मतानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेला तणाव आणि अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचाही गुंतवणुकीच्या इच्छेवर नकारात्मक परिणाम घडविला आहे.

Web Title: The removable footing of foreign investors, the Indian capital markets suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.