बीजिंग : अभूतपूर्व घसरणीनंतर चीनमधील शेअर बाजारांत लावण्यात आलेले सर्किट ब्रेकर शुक्रवारी हटविण्यात आले. त्याबरोबर चिनी बाजारांत सुधारणा झाली.
सकाळी बाजार सुरू होताच शांघाय कंपोजिट निर्देशांक २.२ टक्के घसरला होता. नंतर मात्र तो अपेक्षेप्रमाणे वर चढला. सत्राच्या अखेरीस ३,१८६.४१ अंकांवर बंद झाला. २ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. छोटा निर्देशांक शेंजेन १.२ टक्क्यांनी वाढून १0,८८८.९१ अंकांवर बंद झाला. दोन्ही बाजारांनी ७६१.६ कोटी युआन म्हणजेच ११६.0३ अब्ज डॉलरची उलाढाल केली. सोमवारी आणि बुधवारी ते बाजारात लागू झाले होते.
सर्किट ब्रेकर काढले; चिनी बाजारात तेजी
अभूतपूर्व घसरणीनंतर चीनमधील शेअर बाजारांत लावण्यात आलेले सर्किट ब्रेकर शुक्रवारी हटविण्यात आले. त्याबरोबर चिनी बाजारांत सुधारणा झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2016 12:53 AM2016-01-09T00:53:33+5:302016-01-09T00:53:33+5:30