जर तुम्ही मार्च महिन्यामध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. रेनो आपल्या कारवर ६२ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर करत आहे. मात्र ही सवलत केवळ ३१ मार्चपर्यंतच लागू राहील. स्टॉकमध्ये राहिलेल्या आणि BS6 स्टेज २ च्या नियमांची पूर्तता करत नसलेल्या कारवर कंपनी सवलत देत आहे. आता स्टॉक क्लीअर करण्यासाठी कंपनी या गाड्यांवर बंपर सवलत देत आहे. तसेच डिलरशिपकडूनही अनेक खास ऑफर दिल्या जात आहेत.
Renault Kwid कंपनीची एंट्री लेव्हल हेचबॅक आहे. त्याच्या २०२२ मॅन्युफॅक्चर्ड मॉडेलवर ५७ हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे. हा डिस्काऊंट २५ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि २० हजार रुपयांच्या एक्स्चेंज बेनिफिट्स म्हणून दिला जातो. तर १२ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटही दिला जात आहे. तसेच कंपनी शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना ५ हजार रुपयांची सवलत वेगळी देत आहे. तसेच स्क्रॅपिज पॉलिसींतर्गत १० हजार रुपयांचा डिस्काऊंट आणखी मिळवला जाऊ शकतो.
तर रेनोच्या किगरवर कंपनी ६२ हजार रुपयांची सवलत देत आहे. त्यामध्ये २५ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, २५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि १२ हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काऊंटचा समावेश आहे. जुन्या कारसह नव्या एमिशन नॉर्म्स पूर्ण करणाऱ्या कारच्या सर्व मॉडेलवरही कंपनी मोठ्या प्रमाणावर सवलत देत आहे. कंपन्यी आपल्या मॉडेल्सवर ५४ हजार रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. यामध्ये १० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि २० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि १२ हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काऊंटचा समावेश आहे. रेनोच्या सध्या भारतामध्ये Kwid, Kiger आणि Triber या कार आहेत.
लवकरच रेनो आपली महत्त्वाकांक्षी कार डस्टरचं नवं मॉडेलसुद्धा लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ही कार एका हायब्रिड इंजिनासह येईल. तसेच यावेळी डस्टर ५ सिटर मिड साइज एसयूव्हीच्या जागी ७ सिटर फूल साइज एसयूव्ही वर असेल. रेनोच्या विक्रीच्या आकड्यावर गेल्या काही महिन्यांपासून मोठा परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे आता कंपनीने ही ऑफऱ दिली आहे.