नवी दिल्ली : भारतात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या रेनॉल्ट या वाहन उत्पादक कंपनीच्या ‘कॅप्चर’ या एसयूव्ही वाहनाची बुकिंग सुरू करण्यात आली आहे.सध्या जगभरात रेनॉल्ट ‘कॅप्चर’ची जोरदार चर्चा आहे. भारतात ही गाडी लवकरच येणार असून, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी रेनॉल्टने आपल्या रेनॉल्ट ‘कॅप्चर’ अॅपवर बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक केवळ २५ हजार रुपये भरून ही गाडी बुक करू शकणार आहेत.भारतात सध्या एसयूव्ही वाहनांची मागणी वाढते आहे. ते लक्षात घेऊनच येथे आम्ही नवीन वाहने लाँच करत आहोत. गेल्या काही वर्षांपासून भारतात आमच्या वाहनांची विक्री वाढते आहे, असे रेनॉल्टचे भारतातील सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीत सावने यांनी सांगितले.
रेनॉल्टच्या ‘कॅप्चर’चे बुकिंग सुरू! भारतात सध्या एसयूव्ही वाहनांची वाढती मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:31 AM