नवी दिल्ली : भारतात वेगाने वाढणा-या रेनॉनल्ट कंपनीने त्यांच्या लोकप्रिय क्वीड कारची दोन सुपर हीरो वर्जन गुरुवारी लाँच केली. ही दोन्ही वर्जन ‘आयर्न मॅन’ आणि ‘कॅप्टन अमेरिका’ या घरोघर पोहचलेल्या सुपर हीरोंच्या नावे असणार आहेत. सुपर हीरो कॅरेक्टरप्रमाणेच ‘आयरन मॅन’ वर्जन लाल रंगात तर ‘कॅप्टन अमेरिका’ पांढ-या रंगात मिळणार आहे.
या कंपनीने आतापर्यंत भारतात दोन लाखांहून अधिक गाड्या विकल्या आहेत. क्वीडची ही नवी कार एक गेम चेंजर ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे. क्वीडची या नव्या गाड्या बाजारात उतरवत असताना कंपनीचे इंडिया आॅपरेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय
संचालक सुमित सॉवनी म्हणाले की, सुपर हीरो सीरीजच्या माध्यमातून कंपनीने लोकांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनी कायम ग्राहककेंद्री
विचार करीत असते. कल्पकता, डिझाइन व दर्जा याद्वारे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर आमचा
भर असतो.
रेनॉल्ट ही वर्जन मार्व्हल कंपनीच्या सहकार्याने बाजारात आणली आहेत. ‘आयर्न मॅन’ व ‘कॅप्टन अमेरिका’ ही मार्व्हल कंपनीची सर्वाधिक गाजलेली सुपर हीरो कॅरेक्टर्स क्वीडच्या नवीन मॉडेल्ससाठी निवडण्यात आली आहेत.
मार्व्हल कंपनीचे इंडिया प्रमुख अभिषेक माहेश्वरी म्हणाले की, ‘आयर्न मॅन’ व कॅप्टन अमेरिका’ ही कॅरेक्टर्स लोकांच्या जगण्याचा भाग कशी बनतील, यासाठी आम्ही
नवनवे प्रयोग करीत असतो. इतर एसयूव्ही कारप्रमाणे वर्जनमध्ये
सात इंचाची टच स्क्रीन मीडिया सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट डस्टर,
वन-टच लाइन चेंज इंडिकेटर, रेडियो स्पीड व्हॉल्युम कंट्रोलर, प्रो-सेन्स
सीट बेल्ट अशा अनेक सुविधा असणार आहेत.
रेनॉल्टच्या ‘आयर्न मॅन’ व ‘कॅप्टन अमेरिका’ बाजारात
भारतात वेगाने वाढणा-या रेनॉनल्ट कंपनीने त्यांच्या लोकप्रिय क्वीड कारची दोन सुपर हीरो वर्जन गुरुवारी लाँच केली. ही दोन्ही वर्जन ‘आयर्न मॅन’ आणि ‘कॅप्टन अमेरिका’ या घरोघर पोहचलेल्या सुपर हीरोंच्या नावे असणार आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:22 AM2018-02-10T02:22:06+5:302018-02-10T02:22:26+5:30