मुंबई : रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरणात गुुरुवारी रेपो दर ६.२५ टक्के कायम ठेवले आहेत. मात्र, रिव्हर्स रेपो दरात ०.२५ टक्का वाढ करत हे दर ६ टक्के केले आहेत. यामुळे आता रेपो आणि रिव्हर्स रेपो दरातील अंतर कमी झाले आहे.
आर्थिक वर्ष २०१७ - १८ मधील पहिल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महागाई वाढण्याची शक्यता गृहित धरता रेपो दर ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. तर, बँकींग क्षेत्रातील अतिरिक्त नगदीचा विचार करता रिव्हर्स रेपोमध्ये ०.२५ टक्के वाढ केली आहे. रिव्हर्स रेपोचे दर आता ६ टक्के असतील. मार्जिनिल स्टँडिंग फॅसिलिटीत (एमएसएफ) ०.२५ टक्का कपात करण्यात आली असून तो आता ६.५० टक्के असणार आहे.
हे निर्णय बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. अर्थव्यवस्थेचा सकल मूल्य वृद्धी दर २०१६ - १७ मधील ६.७ टक्क्यांवरुन वाढून चालू आर्थिक वर्षात ७.४ टक्के राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसीय बैठकीनंतर समितीने याबाबत स्पष्ट केले आहे की, सामान्य अर्थव्यवस्था आणि महागाई यावरुन आम्हाला काळजी आहे.
अल निनोचा मान्सूनवर पडणाऱ्या प्रभावाबाबत, जीएसटीची अंमलबजावणी आणि सातव्या
वेतन आयोगाच्या शिफारशींबाबत
ही काळजी व्यक्त करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार, २०१७ - १८ च्या पहिल्या सहामाहीत महागाई ४.५ टक्के आणि दुसऱ्या सहामाहीत ५ टक्के राहण्याची शक्यता आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
रिझर्व्ह बँकेकडून बँका जो निधी घेतात आणि त्यावर जे व्याज द्यावे लागते तो रेपो दर. तथापि, बँका आपल्याकडील निधी रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात. या ठेवींवर बँकांना मिळणारा व्याज दर म्हणजे रिव्हर्स रेपो दर. या ठेवींवर आता बँकांना अधिक व्याज मिळणार आहे.
रेपो दर स्थिर, रिव्हर्स रेपोत ०.२५ टक्के वाढ
रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरणात गुुरुवारी रेपो दर ६.२५ टक्के कायम ठेवले आहेत
By admin | Published: April 7, 2017 12:15 AM2017-04-07T00:15:58+5:302017-04-07T00:15:58+5:30