नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली उच्चाधिकार सचिव समिती जूनअखेरपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव पी.के. सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करीत आहे. सचिवांच्या समितीची ११ जून रोजी अंतिम बैठक होणार आहे. कर्मचाऱ्यांना वेतनात किती आणि कशी वाढ व्हावी याचा अंतिम आढावा या बैठकीत घेतला जाईल. त्यानंतर काही दिवसांतच समिती आपला अहवाल अंमलबजावणीसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाला सादर करील. सुचविली जादा वाढसचिवांच्या समितीने कमाल २,७0,000 रुपये, तर किमान २१,000 रुपये वेतन असावे, असे मत व्यक्त केले आहे. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीच्या तुलनेत समितीने सुचविलेली ही वाढ कमाल पातळीवर २१ हजारांनी, तर किमान पातळीवर ३ हजारांनी जास्त आहे.
वेतन आयोगसाठी जूनअखेरपर्यंत अहवाल
By admin | Published: May 26, 2016 2:04 AM