नवी दिल्ली : अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएमसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांवर दर दोन-तीन महिन्यांमध्ये मोठी सूट असलेला महासेल आयोजित केला जात होता. मात्र, यापुढे त्यांना असे सेल ठेवता येणार नाहीत. केंद्र सरकारने एफडीआय कायद्यात नवीन नियम केले असून 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
केंद्र सरकारने या कंपन्यांवर त्यांच्या नावावर बनविलेली उत्पादने विकण्यास बंदी आणली आहे. म्हणजचे अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्ट त्यांच्या नावावर बनविलेली उत्पादने केवळ त्यांच्याच वेबसाईटवर विकू शकणार नाहीत, तर त्यांना इतर वेबाईटवर ती उपलब्ध करावी लागणार आहेत. हाच नियम इतर कंपन्यांनाही लागू होणार असून एस्क्लूझीव्ह सेलच्या नावाखाली एकाच वेबसाईटवर उत्पादन विकण्यावरही बंदी आणली आहे. यानुसार कंपन्यांना अन्य ठिकाणीही ते उत्पादन विकावे लागणार आहे.
OnePlus, Xiaomi, Realme, Vivo, Oppo, Honor, Huawei या कंपन्यांचे मोबाईल या कंपन्या त्यांच्याशी करार करून स्वत:च्याच वेबसाईटवर विकत होत्या. यामध्ये काही उत्पादने ही या ई-कॉमर्स कंपन्यांच्या गुंतवणुकीतून बनत होती. सेलमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना याचा फटका बसत होता. त्यांनी केंद्र सरकारकडे तगादा लावल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे.