Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘अदानी’कडून हजार काेटी रुपयांची राेखे फेरखरेदी

‘अदानी’कडून हजार काेटी रुपयांची राेखे फेरखरेदी

देशात सर्वाधिक बंदरांचे परिचालन करणाऱ्या अदानी पोर्टसने एका नियामकीय दस्तावेजात ही माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 08:52 AM2023-04-25T08:52:40+5:302023-04-25T08:52:59+5:30

देशात सर्वाधिक बंदरांचे परिचालन करणाऱ्या अदानी पोर्टसने एका नियामकीय दस्तावेजात ही माहिती दिली आहे.

Repurchase of thousand crore rupees from Adani gautam | ‘अदानी’कडून हजार काेटी रुपयांची राेखे फेरखरेदी

‘अदानी’कडून हजार काेटी रुपयांची राेखे फेरखरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’ने (एपीएसईझेड) नजीकच्या काळात परिपक्व होणाऱ्या कर्जरोख्यांचे मुदतीपूर्वी आंशिक पेमेंट करता यावे यासाठी तसेच कंपनीकडील गंगाजळीबाबत विश्वास निर्माण व्हावा, यासाठी डेट सिक्युरिटीजची (रोखे) फेरखरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीने सोमवारी ही माहिती दिली.

देशात सर्वाधिक बंदरांचे परिचालन करणाऱ्या अदानी पोर्टसने एका नियामकीय दस्तावेजात ही माहिती दिली आहे. त्यानुसार, कंपनीने थकीत कर्जापैकी एक हजार काेटी रुपयांपर्यंतच्या रोख्यांच्या फेरखरेदीसाठी निविदा जारी केली आहे. अमेरिकी शॉर्टसेलिंग संस्था हिंडेनबर्गच्या अहवालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

राेखीने पैसे देणार
n जुलै २०२४ साठी १३० दशलक्ष डॉलर मूल्याच्या रोख्यांसाठी या निविदा मागविण्यात आल्या आहेत. 
n या निविदा पुढील ४ तिमाहीत समान प्रमाणात असतील. ३.३७५ टक्के डॉलर-मूल्यवर्गाच्या रोख्यांसाठी फेरखरेदी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. हे रोखे २०२४ मध्ये परिपक्व होतील.  

Web Title: Repurchase of thousand crore rupees from Adani gautam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.