Join us  

सोने-चांदी खरेदीची नामी संधी; दरात झाली मोठी घसरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 10:00 AM

१० दिवसांपूर्वी मोठी भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या दरात आठवडाभरापासून मात्र घसरण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : १० दिवसांपूर्वी मोठी भाववाढ झालेल्या चांदीच्या दरात आठवडाभरापासून मात्र घसरण होत आहे. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत चांदीत आतापर्यंत चार हजार ५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आठवडाभरापूर्वी ६२ हजारांवर असलेले चांदीचे भाव शुक्रवार, १४ ऑक्टोबर रोजी ५७ हजार ५०० रुपयांवर आले. तसेच सोन्याचा भाव गेल्या सहा दिवसांच्या तुलनेत एक हजार ३०० रुपयांनी घसरला आहे.  

डाॅलर वधारला तरी घसरण

अमेरिकन डॉलरचे दर वधारले तर सोने-चांदीचेही भाव वाढतात. मात्र,गेल्या आठवड्याच्या तुलनेत डॉलरचे भाव वधारले असले तरी सोने-चांदीमध्ये घसरण होत आहे. ७ ऑक्टोबर रोजी ८२.३९ रुपयांवर असलेल्या डॉलरचे दर १४ रोजी ८२.४२ रुपयांवर पोहोचले. तरीदेखील सोने-चांदीचे भाव कमी झाले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सोनंचांदी