Lokmat Money > बिझनेस न्यूज > ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?

ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?

रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन बड्या खासगी बँकांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर १ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पाहा काय आहे यामागचं कारण.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:18 AM2024-05-28T10:18:47+5:302024-05-28T10:20:53+5:30

रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन बड्या खासगी बँकांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर १ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पाहा काय आहे यामागचं कारण.

reserve bank imposes penalty on ICICI and Yes Bank 1 91 crores what is the reason | ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?

ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?

रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन बड्या खासगी बँकांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर १ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकांमध्ये येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न करणे आणि अंतर्गत/कार्यालयीन खात्यांचे अनधिकृत कामकाज केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन केले नसल्याचं नियामकाला आढळलं.
 

आयसीआयसीआय बँकेला किती दंड?
 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) २१ मे २०२४ रोजी आयसीआयसीआय बँक लिमिटेडला काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ४७ ए (१) (सी) आणि कलम ४६ (४) (आय) मधील तरतुदींनुसार आरबीआयला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.
 

येस बँकेला किती दंड?
 

रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) १७ मे २०२४ च्या आदेशाद्वारे येस बँक लिमिटेडला 'बँकांमधील ग्राहक सेवा' आणि 'अंतर्गत/ कार्यालयीन खात्यांचं अनधिकृत संचालन' या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 'बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम २६ (४) (आय) सह कलम ४७ ए (१) (सी) आणि कलम ४६ (४) (आय) मधील तरतुदींनुसार आरबीआयला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे,' असं आरबीआयनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.
 

करावा लागला अडचणींचा सामना
 

आयसीआयसीआय बँक आणि येस बँक या दोन्ही भारतातील खासगी क्षेत्रातील प्रमुख बँका आहेत. परंतु, अलीकडच्या काळात या दोन्ही बँकांना काही आव्हानांचा सामना करावा लागला आहे. आयसीआयसीआय बँकेला एनपीए, प्रशासकीय अडचणी आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर येस बँकेला आर्थिक संकट आणि कस्टमर मायग्रेशनच्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. मात्र, या आव्हानांवर मात करण्यासाठी दोन्ही बँकांनी अनेक पावले उचलली आहेत.

Web Title: reserve bank imposes penalty on ICICI and Yes Bank 1 91 crores what is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.