Join us

अ‍ॅक्सिस बँक, आयओबीला रिझर्व्ह बँकेने केला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 12:55 AM

अनुत्पादक भांडवलाच्या (एनपीए) वर्गीकरण नियमांचा भंग केल्याबद्दल अ‍ॅक्सिस बँकेला ३ कोटींचा तर, केवायसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेला (आयओबी) २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली.

मुंबई  - अनुत्पादक भांडवलाच्या (एनपीए) वर्गीकरण नियमांचा भंग केल्याबद्दल अ‍ॅक्सिस बँकेला ३ कोटींचा तर, केवायसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेला (आयओबी) २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली.आरबीआयने म्हटले की, ३१ मार्च २0१६च्या वित्तीय स्थितीच्या आधारे अ‍ॅक्सिस बँकेचे वैधानिक परीक्षण करण्यात आले. बँकेने एनपीएविषयक अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ‘इन्कम रिकग्निशन अँड अ‍ॅसेट क्लासिफिकेशन’ नियमांचे अ‍ॅक्सिस बँकेने पालन केलेले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने २७ फेब्रुवारी २0१८ रोजी एक आदेश जारी करून अ‍ॅक्सिस बँकेला ३0 दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावला. सरकारी मालकीच्या इंडियन ओव्हरसीज बँकेने केवायसी नियमांचे पालन न केल्याचे एका परीक्षणात आढळून आले आहे. बँकेच्या एका शाखेत हा प्रकार घडला आहे. बँकेच्या व्यवहारांत इतरही काही अनियमिमता आढळून आल्या आहेत. त्यामुळे बँकेला २ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.सर्वच बँकांवर लक्षपंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांवरील निगराणी वाढविली आहे. बँकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास घोटाळ्यांना आळा घालणे शक्य होईल, असे रिझर्व्ह बँकेला वाटते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक