मुंबई - आर्थिक अनियमिततेमुळे पंजाब-महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे हजारो ठेवीदार अडचणीत आलेले आहेत. या कारवाईला काही दिवस उलटत नाहीत तोच देशातील सर्वोच्च बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता राज्यातील अजून दोन सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली आहे. नियमांचा भंग केल्याने रिझर्व्ह बँकेने पुण्यातील जनता सहकारी बँक आणि जळगावमधील जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत पुण्यातील जनता सहकारी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जनता सहकारी बँकेने मिळकत ओळख आणि मालमत्ता वर्गीकरण (आयआरएसी) निकष, प्रगती आणि एक्सपोजर मानदंड आणि वैधानिक / इतर निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे.
महाराष्ट्रातील अजून दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 9:17 PM