Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोठी बातमी! २ हजारांची नोट चलनातून मागे; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत

मोठी बातमी! २ हजारांची नोट चलनातून मागे; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 07:13 PM2023-05-19T19:13:37+5:302023-05-19T19:14:14+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 Reserve Bank of India has withdrawn Rs 2,000 currency notes from circulation, but will continue as legal tender, know everything here | मोठी बातमी! २ हजारांची नोट चलनातून मागे; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत

मोठी बातमी! २ हजारांची नोट चलनातून मागे; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत

रिझर्व्ह बँकेनं २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा चलनातून मागे घेतल्या जात असल्या तरी त्याची कायदेशीर मान्यता कायम राहणार आहे. रिझर्व्ह बँकेनं ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि बदलण्याची मुदत दिलीये. यासोबतच २ हजार रुपयांच्या नोटा बँकांनी तात्काळ प्रभावनं देणं बंद करण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिलेत. २३ मे पासून ग्राहकांना एकावेळी २ हजारांच्या १० म्हणजेच २० हजार रूपये मूल्याच्या नोटा बदलता येतील.

२०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.

जरी तुमच्याकडे २ हजार रुपयांच्या नोटा असतील तरी कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँकेनं या नोटा वैध राहणार असल्याचं म्हटलंय. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्हाला बँक किंवा एटीएममधून २ हजार रुपयांच्या नव्या नोटा काढता येणार नाहीत. यासोबतच तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या २ हजार रुपयांच्या जुन्या नोटाही बदलून घ्याव्या लागतील. यासाठी रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरची मुदत दिली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार, ३० सप्टेंबरपर्यंत तुम्ही बँकेत जाऊन २००० रुपयांच्या नोटा बदलू शकता शकता. परंतु एका वेळी तुम्हाला २० रुपयांपर्यंत मूल्याच्याच नोटा बदलता येणार आहेत. तुम्ही तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन हा बदल करू शकता.

२ हजाराच्या नोटा कधीपासून सुरू झाल्या?
नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. नोटबंदीमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि छापल्या जाणाऱ्या बनावट नोटांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते. यावर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत सरकारने विचार न करता हा निर्णय घेतल्याची टीका केली होती. 

Web Title:  Reserve Bank of India has withdrawn Rs 2,000 currency notes from circulation, but will continue as legal tender, know everything here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.