नवी दिल्ली : देशात वाढत्या महाईमुळे अगोदरच लोकांच्या खिशाला कात्री बसली आहे. यातच आरबीआयने मागील महिन्यात ईएमआयच्या व्याजदरात वाढ केली आहे. आता पुन्हा एकदा कर्जदारांना आरबीआय झटका देणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पुढच्या आठवड्यात आरबीआय चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पुन्हा ईएमआयमच्या व्याजदरात वाढ होऊ शकते.
ईएमआयच्या व्याजदरात पुन्हा वाढ झाली तर तुमच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. आरबीआय महागाई नियंत्रित आणण्यासाठी व्याजदर वाढवू शकते. आरबीआय यावेळी ३५ बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ करू शकते,असं तज्ज्ञांचे मत आहे.
आरबीआयची बैठक २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीतील निर्णय ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कर्जदारांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे बोलले जात आहे.
पीएफवरील व्याजदरात वाढ होणार का? केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत दिली मोठी माहिती
देशात सध्या महागाई ७ टक्क्यांच्या पातळीवर आहे. आरबीआयने आतापर्यंत १.४० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. आता पुन्हा व्याजदरात वाढ केल्यास त्याचा थेट परिणाम कर्जदारांवर होणार आहे.