RBI Governor Shaktikanta Das: तुमच्या कर्जाचा EMI पुन्हा एकदा वाढेल की कमी होईल, यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच निर्णय घेणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जावरील हप्ता वाढताना दिसत आहे. आधीत महागाईचे चटके सोसत असलेल्या सर्वसामान्यांना कर्जाचा हप्ता वाढल्यामुळे खिशावर चांगलाच भार पडला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपले द्वि-मासिक चलनविषयक धोरण जाहीर करणार आहे. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत त्याचा निर्णय घेतला जाईल. ही बैठक ८ ते १० ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यानंतर १० ऑगस्टला रिझर्व्ह बँक याबाबतचा निर्णय जाहीर करू शकते, असे सांगितले जात आहे.
चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत काय ठरते, याकडे लक्ष
चलनविषयक धोरण समितीची बैठक दर महिन्याला होते. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती आहे. समितीचा निर्णय गव्हर्नर शक्तिकांत दास १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जाहीर करतील. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत काय ठरते, याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, चलनविषयक धोरण समितीने फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. फेब्रुवारी २०२३ पासून रेपो रेट ६.५ टक्के आहे. एप्रिल २०२३ आणि जून २०२३ पतधोरणात बदल करण्यात आलेला नाही. जुलैमध्ये देशातील बँकांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढल्याचे रिझर्व्ह बँकेने एका अहवालात म्हटले आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर ४.८१ टक्के आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यास सर्व प्रकारच्या कर्जाचे EMI वाढू शकतात, असे सांगितले जात आहे.