Join us

रिझर्व्ह बँक रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 10:56 PM

रेपो रेट घटल्यास कर्जे स्वस्त होणार आहेत. रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक अन्य बँकांना कर्जाऊ रक्कम देते त्यावर आकारले जाणारे व्याज असते.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) येत्या 7 फेब्रुवारीला व्याज दरांची घोषणा करणार आहे. एसबीआयच्या अहवालानुसार आरबीआय 0.25 टक्क्यांची कपात करण्याची शक्यता आहे. महागाई दर आरबीआयच्या अनुमानानुसार असल्याने व्याज दर घटण्य़ाची शक्यता आहे. 

रेपो रेट घटल्यास कर्जे स्वस्त होणार आहेत. रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक अन्य बँकांना कर्जाऊ रक्कम देते त्यावर आकारले जाणारे व्याज असते. बँकांना जर स्वस्तात कर्ज मिळाल्यास त्याचा ग्राहकांनाही फायदा मिळू शकणार आहे. 

एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, आरबीआय व्याजदरात कपात एप्रिलपासून करू शकते. मात्र, 7 फेब्रुवारीला दर घटवण्याची घोषणा करू शकते. आरबीआयने मागील तीन आढावा बैठकांमध्ये रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता. त्या आधीच्या दोन बैठकांवेळी 0.25 टक्क्यांनी दरवाढ केली होती. सध्याचा रेपो दर 6.50 टक्के आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकबँकिंग क्षेत्र