Join us

रिझर्व्ह बँक ओतणार ४० हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 5:06 AM

अर्थव्यवस्थेतील अस्थिरता व सरकारी तिजोरीत असलेली रोखीची चणचण दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक धावून आली आहे.

मुंबई : अर्थव्यवस्थेतील अस्थिरता व सरकारी तिजोरीत असलेली रोखीची चणचण दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक धावून आली आहे. सरकारी रोखे खरेदी करून ४० हजार कोटी रुपये बाजारात ओतण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.डॉलरच्या तुुलनेत रुपया घसरल्याने, बाजारातील रोख तरलता संकटात आली. ही तूट दूर करण्यास रिझर्व्ह बँकेने आॅक्टोबर महिन्यात ३६ हजार कोटी रुपये सरकारी रोख्यांच्या खरेदीमार्फत बाजारात ओतले. या खरेदीला ‘ओपन मार्केट आॅपरेशन्स’ म्हटले जाते. अशीच खरेदी आरबीआय नोव्हेंबरमध्येही करणार आहे. ४० हजार कोटी या माध्यमातून बाजारात ओतले जाणार आहेत.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक