रिझर्व्ह बँकेने देशातील 13 बँकांविरोधात मोठ पाऊल उचलले आहे. जर तुमचे या बँकांमध्ये खाते असेल तर तुमच्यावरही याचा फरक पडू शकतो. आरबीआय देशातील बँकिंग व्यवस्था सुधरण्यासाठी प्रयत्न केले जातात. यात एखाद्या बँकेने नियमाचे उल्लंघन केले तर बँकांवर कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघने केल्यामुळे 13 बँकांवर आरबीआयने कारवाई केली आहे.
विविध नियामक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने सांगितले आहे. या बँकांना 50,000 ते 4 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला आहे. कन्यका नागरी सहकारी बँक, चंद्रपूर वर जास्त दंड ठोठावण्यात आला आहे. RBI ने या बँकेला 4 लाखांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय आरबीआयने बीड येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 2.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
संपत्ती झाली तब्बल ४० लाख काेटींची; गुंतवणूकदारांना केले मालामाल, म्युच्युअल फंडवर जनतेचा विश्वास
याशिवाय वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सातारा, इंदूर प्रीमियर को-ऑपरेटिव्ह बँकेला आरबीआयने प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर पाटण नागरी सहकारी बँक, पाटण आणि तुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मेघालय यांनाही 1.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या बँकांव्यतिरिक्त नागरीक सहकारी बँक मर्यादित, जगदलपूर, जिजाऊ व्यावसायिक सहकारी बँक, अमरावती, ईस्टर्न आणि नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वे को-ऑप बँक, कोलकाता; जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, छतरपूर; नागरीक सहकारी बँक मर्यादीत, रायगड; जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, बिलासपूर; तसेच जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादीत, शहडोल यांनाही मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
या सर्व बँकांवर कारवाईचे मुख्य कारण म्हणजे विविध नियामक अनुपालनांचा अभाव, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय या दंडाचा ग्राहकांसोबत केलेल्या व्यवहारांशी काहीही संबंध नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.