Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बँकेचे एकच लक्ष्य, महागाई आटोक्यात आणण्याचे उद्दिष्टं

रिझर्व्ह बँकेचे एकच लक्ष्य, महागाई आटोक्यात आणण्याचे उद्दिष्टं

अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या वातावरणात बँकेच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारी सुरू झाली. समितीच्या सदस्यांनी पहिल्या दिवशी अस्थिर अर्थव्यवस्थेसंबंधी चर्चा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 06:40 AM2018-10-05T06:40:30+5:302018-10-05T06:40:59+5:30

अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या वातावरणात बँकेच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारी सुरू झाली. समितीच्या सदस्यांनी पहिल्या दिवशी अस्थिर अर्थव्यवस्थेसंबंधी चर्चा केली

Reserve Bank's single goal, to bring inflation down | रिझर्व्ह बँकेचे एकच लक्ष्य, महागाई आटोक्यात आणण्याचे उद्दिष्टं

रिझर्व्ह बँकेचे एकच लक्ष्य, महागाई आटोक्यात आणण्याचे उद्दिष्टं

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे मुख्य काम महागाई नियंत्रण करणे व पतपुरवठा हे आहे. यासंबंधी बँकेच्या पतधोरण समितीने दुसऱ्या दिवशी चर्चा केली. बैठकीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी पतधोरण जाहीर होणार आहे.

अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या वातावरणात बँकेच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारी सुरू झाली. समितीच्या सदस्यांनी पहिल्या दिवशी अस्थिर अर्थव्यवस्थेसंबंधी चर्चा केली. पण दुसºया दिवशी बँकेचे मुख्य काम असलेल्या महागाईवर चर्चा करण्यात आली. सूत्रांनुसार, बँकेला शुक्रवारी रेपो दर घोषित करायचा आहे. रेपो दर हा महागाईशी संलग्न असतो. त्यामुळे बैठकीत गुरुवारी महागाईवर चर्चा झाली. इंधनाचे दर वाढत राहिल्यास त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार आहे. ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो दरवाढीखेरीज अन्य कुठल्या उपाययोजना करता येतील, यावर सदस्यांनी चर्चा केली. बाजारात अतिरिक्त पैसा ओतल्यास पत सुधारणा होईल का, या विषयीसुद्धा सदस्यांनी चर्चा केली. बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल शुक्रवारी दुपारी द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहेत. त्याआधी सकाळी सदस्य रेपो दराबाबत चर्चा करतील, असे सूत्रांनी स्षष्ट केले.
 

Web Title: Reserve Bank's single goal, to bring inflation down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.