करवाई : प्रकल्पातील ३५ विद्युत पंप काढले फुलंब्री : तालुक्यातील सांजूळ मध्यम प्रकल्पातील पाणी साठा आता केवळ पिण्यासाठी राखीव करण्यात आला आहे़ प्रशासनाने कारवाई करताना प्रकल्पात सुरू असलेले ३५ विद्युत पंप काढले आहेत, अशी माहिती तहसीलदार संगीता चव्हाण यांनी दिली़ तालुक्यात तीन मध्यम प्रकल्प आहेत़ त्यापैकी फुलंब्री मध्यम प्रकल्पात २८ टक्के पाणीसाठा, तर वाकोद मध्यम प्रकल्प कोरडा आहे़ सांजूळ मध्यम प्रकल्पात २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ हा जलसाठा पाणीटंचाई असलेल्या गावांना पाणी पुरविण्यास राखीव ठेवण्यात आला आहे़ शनिवारी नायब तहसीलदार प्रवीण पांडे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एस.जी. चेन्ने, कनिष्ठ अभियंता व्ही़ एस़ सिनगारे, महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता पवार यांनी सांजूळ धरणात जाऊन विहिरीतून विद्युत पंप जप्त करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा शेतकर्यांनी स्वत:हून विद्युत पंप काढून घेतो अशी विनंती केली़ यानंतर शेतकर्यांनी प्रकल्पातील ३५ विद्युत पंप काढून घेतले़ ...तर कडक कारवाई होणार-प्रकल्पातील विद्युत पंप काढण्यासाठी परिसरातील शेतकर्यांनी विरोध केला नसला तरी यापुढे प्रकल्पातून पाणी उपसा केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अभियंता एस.जी. चेन्ने यांनी दिला आहे़
सांजूळ प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव
कारवाई : प्रकल्पातील ३५ विद्युत पंप काढले
By admin | Published: April 25, 2016 12:27 AM2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30