Lokmat Money > बिझनेस न्यूज > Resourceful Automobile IPO Allotment : २ यामाहा शोरुम्स, ८ कर्मचारी; 'हा' छोटा IPO ४०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब; किती आहे GMP?

Resourceful Automobile IPO Allotment : २ यामाहा शोरुम्स, ८ कर्मचारी; 'हा' छोटा IPO ४०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब; किती आहे GMP?

Resourceful Automobile IPO Allotment : या छोट्या कंपनीचा आयपीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कंपनीचे केवळ २ यामाहा डीलरशिप शोरूम असून कर्मचाऱ्यांची संख्या ८ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:47 AM2024-08-27T10:47:29+5:302024-08-27T10:47:44+5:30

Resourceful Automobile IPO Allotment : या छोट्या कंपनीचा आयपीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कंपनीचे केवळ २ यामाहा डीलरशिप शोरूम असून कर्मचाऱ्यांची संख्या ८ आहे.

Resourceful Automobile IPO 2 Yamaha showrooms 8 employees Small IPO Over 400 Times Subscribed How much is GMP details | Resourceful Automobile IPO Allotment : २ यामाहा शोरुम्स, ८ कर्मचारी; 'हा' छोटा IPO ४०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब; किती आहे GMP?

Resourceful Automobile IPO Allotment : २ यामाहा शोरुम्स, ८ कर्मचारी; 'हा' छोटा IPO ४०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब; किती आहे GMP?

Resourceful Automobile IPO : रिसोर्सफुल ऑटोमोबाईल या छोट्या कंपनीचा आयपीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कंपनीचे केवळ २ यामाहा डीलरशिप शोरूम असून कर्मचाऱ्यांची संख्या ८ आहे. या छोट्या कंपनीच्या आयपीओवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्यात. रिसोर्सफुल ऑटोमोबाईल्सचा आयपीओ ४१२ पटीहून अधिक सब्सक्राइब झालाय. केवळ १२ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी २७०० कोटी रुपयांची बोली लागली. ग्रे मार्केटमध्येही रिसोर्सफुल ऑटोमोबाईल्सचे शेअर्स कमाल करताना दिसताहेत.

१०५ वर पोहोचला जीएमपी

रिसोर्सफुल ऑटोमोबाईल्सच्या आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ११७ रुपये आहे. तर ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स १०५ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. सध्याच्या ग्रे मार्केट प्रीमियमनुसार (जीएमपी) रिसोर्सफुल ऑटोमोबाईल्सचे शेअर्स बाजारात २२२ रुपयांच्या जवळपास लिस्ट होऊ शकतात. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स देण्यात येतील, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी ९० टक्के नफा मिळण्याची शक्यता आहे.

रिसोर्सफुल ऑटोमोबाईलचा आयपीओ एकूण ४१२.६५ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ४८४.२६ पट, तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (एनआयआय) हिस्सा ३१५.२३ पट आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार केवळ एका लॉटसाठी बोली लावू शकतात. आयपीओच्या एका लॉटमध्ये १२०० शेअर्स आहेत. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १४०४०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

कंपनी काय करते?

रिसोर्सफुल ऑटोमोबाईल्स ची सुरुवात २०१८ मध्ये झाली. ही कंपनी 'साहनी ऑटोमोबाइल' या कंपनीअंतर्गत दुचाकींची विक्री करते. कंपनीकडे सध्या अटॅच्ड वर्कशॉपसह २ शोरूम्स आहेत. नवी दिल्लीतील ब्लू स्क्वेअर द्वारका येथे कंपनीचं शोरूम आहे. तर कंपनीचे दुसरे शोरूम पालम रोड, नवी दिल्ली येथे आहे. ३१ जुलै २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार कंपनीत एकूण ८ कायम स्वरूपी कर्मचारी आहेत.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Resourceful Automobile IPO 2 Yamaha showrooms 8 employees Small IPO Over 400 Times Subscribed How much is GMP details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.