दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ॲमेझॉनने सुरू केलेल्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ला दणक्यामध्ये प्रारंभ झाला असून, कोविड साथीनंतरच्या काळामध्ये आलेली ही ऑफर म्हणजे ग्राहकांना कमी किमतीमध्ये चांगल्या ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्याची आगळीवेगळी संधीच आहे. नेहमी येणाऱ्या ऑफर आणि यावेळचा फेस्टिव्हल यामध्ये काय बदल आहे, याबाबत ॲमेझॉन ॲमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी यांच्याशी केलेली बातचित...
सध्या सुरू असलेला ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ हा ॲमेझॉनसाठी वेगळा कसा आहे?ग्रेट इंडियन फेस्टिव्हलला पहिल्या ४८ तासांमध्येच ग्राहकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा निश्चितच आनंददायी आहे. आमचे ब्रॅण्ड पार्टनर्स आणि विक्रेते यांच्यासाठी ही या वर्षामधील सर्वात मोठी संधी आहे. ॲमेझॉनच्या या पूर्वीच्या ऑफर्स आणि यावेळचा फेस्टिव्हल यामध्ये बराच फरक आहे. यावर्षी आम्ही अनेक नवीन व्यापारी आणि दुकानदारांना आमच्या बरोबर घेतले आहे. यामुळे ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू अधिक वेगाने मिळू शकतील. तसेच आमच्या पुरवठादारांची साखळी आणखी मजबूत होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये पहिल्या ४८ तासांमध्येच ५०००हून अधिक विक्रेत्यांकडे १० दशलक्ष रुपयांच्या ऑर्डर्स आल्या आहेत. विशेष म्हणजे आलेल्या ऑर्डर्सपैकी ६६ टक्के ऑर्डर्स या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीमधील शहरांमधून नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्नाटकातील यादगीर, तामिळनाडूतील विरुधुनगर, बिहारमधील लखीसराई अशा लहान लहान शहरांचा समावेश ही नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. यामधून ई-कॉमर्स आता छोट्या शहरांमध्ये पोहोचल्याचे अधोरेखित होत आहे.
भारतामधील विक्री वाढविण्यासाठी कोविड-१९वी साथ ही ॲमेझॉनसाठी संधी ठरली आहे का?कोविडच्या साथीमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मुख्य म्हणजे या साथीच्या काळात नागरिकारांना आपल्या गरजेच्या गोष्टी मिळविण्यासाठी ई-कॉमर्स कसे उपयुक्त आहे, ते जाणवले. त्यामुळेच कोविडच्या साथीनंतर ऑनलाइन खरेदीमध्ये वाढ झालेली दिसत आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून वस्तू घेतल्यास आपली सुरक्षितता कायम राहते, याचीही नागरिकांना खात्री पटली आहे. या काळामध्ये ॲमेझॉनच्या टीमने केलेले काम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन ग्राहकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू अगदी दारात पोहोचवतानाच वेळ आणि पैशाची बचत कशी होईल, याकडेही स्टाफने विशेष लक्ष पुरविले. याच काळामध्ये ॲमेझॉनचे जे छोटे बिझनेस पार्टनर आहेत, त्यांनाही मदतीची गरज होती. हे लक्षात घेऊन आम्ही त्यांच्या मदतीने ग्राहकांपर्यंत अधिक लवकर पोहोचू शकलो. त्यामधून आमच्या बिझनेस पार्टनर्सनाही काही प्रमाणात मदत करता आली, याचे समाधान मोठे आहे.कोविड साथीनंतर ॲमेझॉनकडे येणाऱ्या ऑर्डर्समध्ये ५० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. आमच्याकडे आधीपासून येत असलेल्या किराणा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या ऑर्डर्स कायम आहेतच. याशिवाय आता घरून अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी, गृहोपयोगी तसेच स्वयंपाकघरातील गरजेच्या वस्तू, लॅपटाॅप, मोबाइल फोन आणि ॲक्सेसरीज, कपडे यांच्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत.
यावर्षी भारतीय नागरिकांनी ॲमेझॅानसोबत सण सरजरेकरताना कोणते वेगळेपण अनुभवले?यावर्षीच्या सणांमध्ये ऑनलाईन खरेदीला मिळालेले प्राधान्य हे वेगळेपण राहिले. सेलच्या पहिल्या ४८ तासांमध्येच ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यामध्ये सर्वाधिक मागणी राहिली ती स्मार्टफोन, ग्राहकोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना. तसेच फॅशनच्या वस्तुंनाही ग्राहकांची पसंती लाभली. या सेलच्या काळामध्ये अनेक कंपन्यांनी नवीन उत्पादने सादर केली असून त्यांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याशिवाय लॅपटॅाप, हेडफोन्स, टॅबलेटस्,कॅमेरे, स्मार्ट वॉचेस, टीव्ही यांनाही मोठी मागणी राहिली. सध्या सुरू असलेल्या वर्क फ्रॉम होममुळेही काही वेगळ्या वस्तुंची विक्री वाढली आहे. त्यामध्ये स्टडी टेबल, खुर्च्या आणि डिशवॉशर यांचा समावेश आहे.
ॲमेझॉनने विक्रेत्यांना व्यवसाय वाढण्यासाठी कसे सहाय्य केले?ॲमेझॉनच्या माध्यमातून देशातील लाखो छोटे आणि मध्यम उद्योग आपली उत्पादने विकत असतात. त्यांच्यामार्फत तयार झालेली सुमारे ४ कोटी उत्पादने देशाच्या १०० शहरांमध्ये असलेल्या २० हजार दुकानांमधून नागरिकांना उपलब्ध होत आहेत. ॲमेझॉनतर्फे लोकल शॉप, ॲमेझॉन लॉन्चपॅड, ॲमेझॉन सहेली आणि ॲमेझॉन कारीगर अशा विविध उपक्रमांमधून विक्रेत्यांना विक्री वाढविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असतात. या माध्यमांमधून विक्रेते अधिक नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यातून त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होऊ शकते.
या काळात ॲमेझॉनने काही नवीन प्रॉडक्टस लॉन्च केली आहेत का?होय. मात्र ही प्रॉडक्ट ॲमेझॉनने नाही तर त्या वस्तुंच्या उत्पादकांनी लॉन्च केली असून त्यांना मोठा प्रतिसादही लाभला आहे. या सेलच्या काळामध्ये वनप्लस ८ टी, सॅमसंग एम३१ प्राईम एडिशन, वन प्लस नॉर्ड (ग्रे ॲश), मॅगी टू मिनटस् देसी चीजी मसाला, सॅमसंगचे ६.५ किलो क्षमतेचे पूर्णपणे स्वयंचलित वॉशिंग मशीन,बिबा आणि मॅक्सने आणलेले नवीन कलेक्शन अशी अनेक नवीन प्रॉडक्ट लॉन्च झाली. जवळपास सर्वच नवीन प्रॉडक्टसना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
ग्राहकांना प्रोत्साहनासाठी योजना आहेत का?ग्राहकांना पैसे भरणे सोपे कसे होईल याकडे ॲमेझॉनने नेहमीच लक्ष पुरविले आहे. यावेळी प्रथमच २४ बँकांमार्फत इएमआयची सुविधा पुरविली असून त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधून चांगला प्रतिसाद लाभला आहे. सुमारे ६०० कोटी रुपयांची रक्कम या योजनेंतर्गत देण्यात आली आहे. याशिवाय ॲमेझॉन पे ने ॲमेझॉन पे लेटर अशी एक नवीन योजनाही सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम असण्याची गरज भासत नाही.
कोविडमुक्त डिलिव्हरीसाठी नियोजन कसे केले?कोविड-१९च्या साथीमुळे आमचे कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टर्स व अन्य व्यक्तिंना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर दक्षता घेतली. सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले. आमच्या कर्मचाऱ्यांकडून फेसशिल्डचा वापर, योग्य अंतर राखणे, तापमानाची तपासणी अशी सर्व काळजी घेण्यात आली. त्यामुळे ग्राहकांपर्यंत त्यांची ऑर्डर कोविडमुक्त पोहोचवणे शक्य झाले आहे.
ॲमेझॉनबरोबर सण-उत्सव साजरे करण्याबाबत आपण काय संदेश द्याल?देशभरातील लक्षावधी ग्राहकांपर्यंत आमच्या पार्टनर आणि विक्रेत्यांची उत्पाने आम्ही पोहोचवित असतो. त्याचवेळी आमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजेच्या सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ठळक वैशिष्ट्ये- पहिल्या ४८ तासांमध्येच नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद- या कालावधीमध्ये १० दशलक्ष रुपयांहून अधिक रकमेच्या ऑर्डर्स- देशभरातील अनेक नवीन शहरांमध्ये विक्रेत्यांची नियुक्ती- दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधून ऑर्डर्स वाढल्या- अनेक कंपन्यांनी केली नवीन प्रॉडक्टस् लॉन्च- कंपन्यांच्या नवीन उत्पादनांवर ग्राहकांच्या पडल्या उड्या- प्रथमच देण्यात आला इएमआय मार्फत खरेदीचा पर्याय
(वा. प्र.)