Join us

देशातील खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यतेलाच्या साठ्यांवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 8:32 AM

देशातील खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांकडील खाद्यतेलाच्या साठ्यांवर निर्बंध लादले आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.

नवी दिल्ली : देशातील खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांकडील खाद्यतेलाच्या साठ्यांवर निर्बंध लादले आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. मात्र, काही आयातदार आणि निर्यातदारांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे. सरकारच्या माहितीनुसार गेल्या वर्षभरामध्ये देशातील खाद्यतेलाच्या किमतीमध्ये किरकोळ बाजारामध्ये ४६.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामधील मूल्य वाढ त्याचबरोबर देशांतर्गत बाजारपेठेतील कमी झालेला पुरवठा यामुळे ही किंमतवाढ झाल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये खाद्यतेलाच्या किमती कमी होणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याबाबत सर्व राज्य सरकारांना निर्देश देण्यात आले असून त्यांच्याकडून व्यापाऱ्यांकडील साठ्याच्या मर्यादेबाबतचे आदेश काढले जातील.

टॅग्स :व्यवसायभारत