वॉशिंग्टन/मॉस्को : भारतरशियाकडून ४५० कोटी डॉलर्स खर्चून ‘एस-४००’ ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करीत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे. पण रशियन द्वेषामुळे ही क्षेपणास्त्र खरेदी अमेरिकेला खुपत आहे. त्यामुळे त्यांनी भारतावर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे.
भारत-रशिया संरक्षण संबंधांतर्गत भारत ही खरेदी करीत आहे. अशीच खरेदी चीननेही केली होती. पण त्यानंतर अमेरिकेने चीनवर आर्थिक निर्बंध आणले. चिनी मालाच्या आयातीवर अमेरिकेने भरमसाट शुल्क लावले. त्याचा चिनी बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला. असेच निर्बंध आता अमेरिका भारतावर आणू पाहत आहे.
रशियाकडून क्षेपणास्त्र घेतल्यास भारतावर निर्बंध
भारत रशियाकडून ४५० कोटी डॉलर्स खर्चून ‘एस-४००’ ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करीत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 04:57 AM2018-09-22T04:57:35+5:302018-09-22T04:58:03+5:30