मुंबई - आर्थिक अडचणीत आलेल्या येस बँकेत जादा भांडवल घालून व नवे संचालक मंडळ नेमून बँकेचे पुनरुज्जीवन करण्याच्या रिझर्व्ह बँकेने प्रस्तावित केलेल्या योजनेस केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने या बँकेवर लादलेले निर्बंध येत्या बुधवारच्या संध्याकाळपासून उठविले जातील. त्यामुळे खात्यांतून पैसे काढण्यावर घातलेली कमाल ५० हजार रुपयांची मर्यादा लागू असणार नाही.
या संबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केली. त्यानुसार यानंतर कामकाजाचे तीन दिवस उलटल्यानंतर म्हणजे येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता येस बँकेवरील निर्बंध उठतील. रिझर्व्ह बँकेने ५ मार्च रोजी हे निर्बंध लागू करताना येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकही नेमला होता. आता काढलेल्या अधिसूचनेनुसार येत्या सात दिवसांत बँकेचा कारभार नव्या संचालक मंडळाकडे सुपूर्द केला जाईल.
स्टेट बँकेचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी व उप व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार हे येस बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. पंजाब नॅशनल बँकेचे अध्यक्ष सुनील मेहता यांची अकार्यकारी अध्यक्ष वमहेश कृष्णमूर्ती आणि अतुल भेडा यांची अकार्यकारी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. स्टेट बँक आणखी दोन तर रिझर्व्ह बँक आणखी एक संचालक नेमेल.
येस बँकेवरील निर्बंध बुधवारपासून उठणार
या संबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केली. त्यानुसार यानंतर कामकाजाचे तीन दिवस उलटल्यानंतर म्हणजे येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता येस बँकेवरील निर्बंध उठतील.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 03:48 AM2020-03-15T03:48:38+5:302020-03-15T03:49:09+5:30