Join us  

BREAKING: सर्वसामान्यांना झटका, सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत वाढ; ७.४१ टक्क्यांवर पोहोचला दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 7:16 PM

सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली आहे.

सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यात ऑगस्टच्या तुलनेत महागाईच्या दरात 0.41 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईचा दर ७ टक्के इतका होता. एप्रिलनंतरची महागाईतील ही सर्वात मोठी वाढ आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई वाढल्याचे दिसून येत आहे.

सप्टेंबर महिना हा सलग नववा महिना आहे ज्यात महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेने चलनवाढीचा दर ६ टक्के निश्चित केला आहे, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हा दर ७ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. नुकतंच रिझर्व्ह बँकेनं या दराबाबत चिंता व्यक्त केली होती. रिझर्व्ह बँक फक्त किरकोळ महागाईच्या आधारावर रेपो दर वाढवते. महागाई अशीच सुरू राहिल्यास रिझर्व्ह बँकेला रेपो दरात पुन्हा वाढ करावी लागेल. यामुळे कर्जाचे व्याजदर महाग होणार असून ईएमआयमध्येही वाढ होणार आहे.

महागाई ऑगस्टच्या तुलनेत जास्तकिरकोळ महागाईची अधिकृत आकडेवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. हा आकडा ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच CPI च्या आधारे जाहीर करण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये CPI वर आधारित महागाई 7.41% आहे. बरोबर एक वर्षापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये हा दर ४.३५ टक्के होता. ऑगस्टमध्ये हा दर ७ टक्के होता. खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ हे या महागाईमागील खरे कारण असल्याचे बोलले जात आहे. खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ऑगस्टमध्ये 7.62 टक्के इतका होता. तर सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे.

६ टक्क्यांची मर्यादा ओलांडलीमहागाईचा दर ६ टक्क्यांच्या वर राहिल्याने RBI ला आता केंद्र सरकारसमोर एक अहवाल सादर करावा लागेल ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी २ टक्क्यांच्या फरकासह ४ टक्के महागाई नियंत्रित करण्यात अपयशी ठरण्याची कारणे स्पष्ट करावी लागणार आहेत. केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाई २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान असावी याची खात्री करण्यास सांगितले आहे. पण त्याचा दर ७ टक्के आणि त्याहून अधिक दिसत आहे.

महागाई वाढल्याने त्याचा सर्वांगीण परिणाम आर्थिक विकासावर दिसून येईल. महागाईचे प्रमुख कारण म्हणजे चढ्या किमतीत होणारी आयात, जी परदेशातून आयात केली जाते. अनेक क्षेत्रांमध्ये महागाई कमी झाली आहे, परंतु अन्नपदार्थ आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून किरकोळ महागाईत सातत्याने वाढ होत असून, ती रोखण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे.

IIP मध्ये घसरणदुसरीकडे ऑगस्टमध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनात (आयआयपी) 0.8 टक्क्यांनी घट झाली आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात औद्योगिक उत्पादनात १३ टक्के वाढ झाली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) बुधवारी जाहीर केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2022 मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन 0.7 टक्क्यांनी घसरले. या व्यतिरिक्त खाण उत्पादनात ३.९ टक्क्यांनी घट झाली आहे, तर वीज निर्मितीत १.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टॅग्स :महागाईव्यवसाय