Join us  

देशात महागाईचा भडका! साबण-शॅम्पूच्या किंमती पक्त 3 महिन्यांत 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 3:49 PM

गेल्या तीन महिन्यांत दैनंदीन वापरातील अनेक वस्तुंच्या किंमती 3 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. साबण, शॅम्पू, टूथपेस्टशिवाय वॉशिंग पावडर, चहा पावडर, खाद्य तेल, केचप, जॅम, नूडल्स आणि बेबी फूड आदि वस्तूंच्या किंमतीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. (Retail inflation)

नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या किंमतींबरोबरच साबण, शॅम्पू आणि टूथपेस्ट सारख्या दैनंदीन वापरातील आणि आवश्यक असलेल्या वस्तुंच्या किंमतीही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. एका रिपोर्टनुसार, गेल्या तीन महिन्यांत दैनंदीन वापरातील अनेक वस्तुंच्या किंमती 3 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. साबण, शॅम्पू, टूथपेस्टशिवाय वॉशिंग पावडर, चहा पावडर, खाद्य तेल, केचप, जॅम, नूडल्स आणि बेबी फूड आदि वस्तूंच्या किंमतीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. (Retail inflation shampoo soap prices increased by 40 percent in only 3 months)

एवढेच नाही, तर 1 जुलैपासून अमूलनेही दिल्ली-एनसीआर बरोबरच अहमदाबाद आणि गुजरातच्या सौराष्ट्रात दुधाच्या किंमती 2 रुपये प्रति लिटरने वाढवल्या आहेत. दोन रुपये प्रती लीटर भाव वाढ केल्याने एमआरपीत चार टक्क्यांनी वाढ होते.  गेल्या 1.5 वर्षांत, अमूलने दुधाच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ केली नव्हती.

स्मार्टफोन, टीव्ही, कार आणि फ्रिज जुलै महिन्यात महाग होणार! असं आहे कारण

LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला -सरकारी तेल कंपन्यांनी घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्‍लीत एलपीजी सिलिंडरचा भाव आता 834 रुपये झाला आहे. यापूर्वी घरगुती गॅसची किंमत 809 रुपये एवढी होती. एप्रिल महिन्यात सिलिंडर 10 रुपयांनी स्वस्त झाले होते. यानंतर मे-जूनमध्ये किंमतीत काहीही बदल झाला नाही. आज दिल्लीशिवाय कोलकात्यात एलपीजी सिलिंडर 861 रुपयांना विकले जात आहे. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये सिलिंडरची किंमत अनुक्रमे 834 आणि 850 रुपये एवढी आहे.

कर कपातीमुळे पामतेल होणार आणखी स्वस्त; केंद्राचा सर्वसामान्यांना दिलासा

एसी, टीव्ही, फ्रीज, कूलर आणखी महागणार -घरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या किंमतीही वाढणार आहेत. लॉकडाउनमुळे देशात अनेक कंपन्या बंद पडल्या हेत्या. यामुळे अनेक गाष्टींचे उत्पादन होत नव्हते. यातच एक गोष्ट म्हणजे कॉपर. लॉकडाउनमध्ये कॉपरचे उत्पादनन बंद पडले होते. मागणी वाढल्याने कॉपरच्या किंमतीत आधीच वाढ झाली आहे. यामुळेच टीव्ही, फ्रीज, कूलर आणि एसी सारख्या वस्तूंच्या किंमतीही वाढने निश्चित आहे. या सर्व गोष्टीसाठी कॉईलची आवश्यकता असते आणि यात कॉपरचा वापर होतो.

पामतेल होणार स्वस्त - गगनाला भिडलेले खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अखेर पावले उचलली असून कच्च्या पाम तेलावरील बेसिक सीमा शुल्कात 5 टक्के कपात करण्यात आली आहे. कच्च्या पाम तेलावर आता 10 टक्के बेसिक सीमा शुल्क लावले जाईल. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होत असून तो 30 सप्टेंबरपर्यंत लागू असेल. 

टॅग्स :महागाईबाजारभारत