नवी दिल्ली : स्पेक्ट्रम प्रकरणात केंद्र सरकारने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) ला १०४ कोटी रुपये परत करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
टेलिकॉम डिस्प्युट अॅण्ड अपिलेट ट्रायब्युनल (टीडीसॅन)नेही २१ डिसेंबर २०१८ रोजी केंद्राने रिलायन्स कम्युनिकेशन्सला १०४ कोटी रुपये परत करण्याचा आदेश दिला होता. टीडीसॅटने आरकॉमच्या बँक गॅरंटीमधील ९०८ कोटी रुपयांतील ७०४ कोटी रुपये कापून उरलेली १०४ कोटींची रक्कम परत करावी, असा टीडीसॅटचा आदेश होता.
या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आरकॉमला १०४ कोटी परत करा
स्पेक्ट्रम प्रकरणात केंद्र सरकारने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) ला १०४ कोटी रुपये परत करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:07 AM2020-01-08T04:07:49+5:302020-01-08T04:07:57+5:30