नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न्स) भरताना पॅनऐवजी आधार क्रमांक वापरण्याची संमती करदात्यांना असली तरी चुकीचा आधार क्रमांक दिल्यास करदात्यांना १0 हजार रुपये दंड होऊ शकेल. त्यामुळे आधार क्रमांक अचूक असेल, याची करदात्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
प्राप्तिकर खात्याने कायद्यामध्ये बदल करून पॅनऐवजी आधार क्रमांक वापरण्याची परवानगी करदात्यांना दिली आहे. मात्र याच कायद्यात चुकीचा आधार क्रमांक देणाऱ्यांना दंडाचीही तरतूद आहे. त्यामुळे घाईघाईत वा गोंधळात चुकीचा आधार क्रमांक दिल्यास दंड होईल, असे प्राप्तिकर विभागाने जाहीर केले आहे. आधारचे संचालन युनिक आयडेंटिफिकेश अथॉरिटी आॅफ इंडियातर्फे (यूआयडीएआय) होते. मात्र तो क्रमांक चुकीचा दिल्यास दंड मात्र प्राप्तिकर विभाग आकारणार आहे.
>चुकीच्या पटीत दंड
प्राप्तिकर कायद्याच्या २७२ (ब) या कलमामध्ये तशी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक वेळा चुकीचा क्रमांक घातल्यास प्रत्येक चुकीला १0 हजार रुपये याप्रमाणे दंडात वाढ होईल, असेही प्राप्तिकर खात्याने स्पष्ट केले आहे.
रिटर्न्समध्ये चुकीचा आधार क्रमांक दिल्यास होणार दंड
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न्स) भरताना पॅनऐवजी आधार क्रमांक वापरण्याची संमती करदात्यांना असली तरी चुकीचा आधार क्रमांक दिल्यास करदात्यांना १0 हजार रुपये दंड होऊ शकेल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 05:11 AM2019-11-14T05:11:23+5:302019-11-14T05:11:30+5:30