नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) आधारकार्डशी जोडले गेलेले भविष्य निधी (पीएफ) व बँक खातेदार अंशधारकांसाठी असलेल्या भविष्य निधी काढण्यासाठीच्या आॅनलाईन व्यवस्थेचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.कोणत्याही नागरिकाला कोणतीही देय रक्कम देण्यासाठी आधारकार्ड सादर करणे सक्तीचे नाही, असा निर्णय या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ईपीएफओने या सुविधेचा आढावा घ्यायचा निर्णय घेतला.ईपीएफओचे आयुक्त के.के. जालान यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आम्ही या प्रश्नावर कायद्याचा सल्ला मागितला आहे. सध्या भविष्य निधीची रक्कम काढण्यासाठी त्या कार्यालयात जाऊन अंशधारकाला विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो.’
आॅनलाईन पीएफ काढण्याच्या योजनेचा आढावा
By admin | Published: August 18, 2015 10:03 PM