Join us

ऑनलाइन गेमिंगवरील GST दरांमध्ये सुधारणा, २८% GST प्रकरणावर सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 12:10 PM

ऑनलाइन मनी गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के कर आकारण्यासाठी जीएसटी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं.

GST 28% Apply online gaming from October: ऑनलाइन मनी गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के कर आकारण्यासाठी जीएसटी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. शुक्रवारी संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं, त्यानंतर १८ ऑक्टोबरपासून या खेळांवर २८ टक्के जीएसटी दर लागू होईल. आतापर्यंत या खेळांवर १८ टक्के जीएसटी आकारला जात होता.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ऑनलाइन मनी गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के कर लावण्याचं विधेयक सादर केलं. हे विधेयक कोणत्याही चर्चेविना आवाजी मतदानानं मंजूर झालं. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२३ पासून या खेळांवर जीएसटीचा नवा दर लागू होईल.

जीएसटी सुधारणा ऑनलाइन गेमिंग आणि ऑनलाइन मनी गेमिंगमध्ये फरक करतात. ऑनलाइन गेमिंग कंपन्या आणि कसिनोद्वारे व्हर्च्युअल डिजिटल एसेट्समध्ये (VDA) मिळालेले पैसे आणि जिंकलेली रक्कम जीएसटी अंतर्गत आणले गेले आहेत आणि परदेशातून ऑनलाइन मनी गेमिंगचा पुरवठा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी नोंदणी अनिवार्य करते.

जीएसटी कौन्सिलची शिफारसकेंद्रीय मंत्रिमंडळाने CGST आणि IGST कायद्यातील सुधारणांना मंजुरी दिल्यानंतर ही दोन्ही विधेयके संसदेत सादर करण्यात आली. २ ऑगस्ट रोजी जीएसटी कौन्सिलने आपल्या ५१ व्या बैठकीत कसिनो, हॉर्स रेसिंग आणि ऑनलाइन गेमिंगच्या बाबतीत कर आकारणीबाबत स्पष्टता आणण्यासाठी CGST कायदा, २०१७ च्या अनुसूची III मध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली होती.

टॅग्स :जीएसटीनिर्मला सीतारामनपैसा