मुंबई : दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून बंद असलेल्या विमा पॉलिसीज पुन्हा सुरू करण्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) परवानगी दिली आहे. याचा पॉलिसीधारकांना मोठा फायदा होणार आहे. एलआयसीने एक टष्ट्वीट करून या निर्णयाची माहिती दिली. टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांसाठी बंद पडलेल्या पॉलिसीज पुन्हा सुरू करण्याची मोठी संधी आणली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून बंद असलेल्या आणि यापूर्वी पुन्हा सुरू करता येण्याची परवानगी नसलेल्या पॉलिसीही आता पॉलिसीधारक पुनरुज्जीवित करू शकतील.
‘ईर्डाई प्रॉडक्ट रेग्युलेशन- २0१३’चे नियम १ जानेवारी २0१४ मध्ये अमलात आले. या नियमांनुसार पहिल्या थकीत हप्त्याच्या तारखेपासून पुढे दोन वर्षांपर्यंतच्या पॉलिसीच पुनरुज्जीवित करण्यात येत होत्या. त्यामुळे १ जानेवारी २0१४ पूर्वी घेतलेल्या सर्व पॉलिसींपैकी ज्या पॉलिसींचे हप्ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून थकले आहेत, त्या पॉलिसी पुनरुज्जीवित करता येत नव्हत्या. त्यामुळे पॉलिसीधारक आणि विमा कंपन्या असे दोघांचेही नुकसान होत होते.५ वर्षांपर्यंतच्या पॉलिसी करता येणार सुरूयाप्रकरणी एलआयसीने ईर्डाईशी संपर्क साधला होता. त्यामुळे आता नॉन-लिंक्ड पॉलिसीज ५ वर्षांपर्यंत, तर लिंक्ड पॉलिसीज ३ वर्षांपर्यंत पुनरुज्जीवित केल्या जाऊ शकतील.