Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC ची पॉलिसी लॅप्स झाली?, टेन्शन घेऊ नका; कंपनीनं सुरू केली मोहीम, २२ ऑक्टोबर पर्यंत पुन्हा सुरू करता येणार

LIC ची पॉलिसी लॅप्स झाली?, टेन्शन घेऊ नका; कंपनीनं सुरू केली मोहीम, २२ ऑक्टोबर पर्यंत पुन्हा सुरू करता येणार

LIC कडून पॉलिसी लॅप्स झालेल्या ग्राहकांना संधी. सोमवारपासून कंपनीनं सुरू केली ग्राहकांसाठी नवी मोहीम.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:13 PM2021-08-23T19:13:33+5:302021-08-23T19:16:39+5:30

LIC कडून पॉलिसी लॅप्स झालेल्या ग्राहकांना संधी. सोमवारपासून कंपनीनं सुरू केली ग्राहकांसाठी नवी मोहीम.

revive laps lic policy a chance till october 22 policy started again special revival campaign started | LIC ची पॉलिसी लॅप्स झाली?, टेन्शन घेऊ नका; कंपनीनं सुरू केली मोहीम, २२ ऑक्टोबर पर्यंत पुन्हा सुरू करता येणार

LIC ची पॉलिसी लॅप्स झाली?, टेन्शन घेऊ नका; कंपनीनं सुरू केली मोहीम, २२ ऑक्टोबर पर्यंत पुन्हा सुरू करता येणार

HighlightsLIC कडून पॉलिसी लॅप्स झालेल्या ग्राहकांना संधी.सोमवारपासून कंपनीनं सुरू केली ग्राहकांसाठी नवी मोहीम.

जर तुमची एलआयसी पॉलिसी लॅप्स होत असेल तर तुम्हाला 22 ऑक्टोबरपर्यंत संधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ सोमवारपासून म्हणजेच 23 ऑगस्टपासून एक विशेष पुनरुज्जीवन अभियान (रिवायवल) सुरू करत आहे. या अंतर्गत, 23 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबरपर्यंत कधीही तुमची बंद पडलेली पॉलिसी 23 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर दरम्यान कधीही सुरू करू शकता.

विशेष पुनरुज्जीवन मोहिमेअंतर्गत ग्राहकाला यासाठी एकूण प्रीमियमवर सूट दिली जाईल. तथापि, जे काही वैद्यकीय आवश्यकता असतील त्यामध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. मॅक्रो इन्शुरन्स आणि हेल्थ या दोन्हींवर लेट फी माफ केली जाईल. या विशेष पुनरुज्जीवन मोहिमेअंतर्गत, ते विशेष विमा सुरू केले जाऊ शकतात, जे 5 वर्षांपेक्षा कमी काळासाठी बंद पडलेले आहेत. तथापि, मुदत विमा आणि एकाधिक जोखीम पॉलिसींवर कोणतीही सूट मिळणार नाही. यासाठी तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल.


३० टक्क्यांपर्यंत सूट
एलआयसीने म्हटले आहे की 1 लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियमसह विम्यावर 20 टक्के सूट किंवा जास्तीत जास्त 2 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येईल. तर, 1 लाख 1 ते 3 लाख रुपये वार्षिक प्रीमियम असलेल्या पॉलिसींना 25% किंवा जास्तीत जास्त 2,500 रुपयांची सूट मिळेल. 3 लाख 1 रूपये आणि त्यापेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या पॉलिसींसाठी 30% किंवा जास्तीत जास्त 3 हजार रुपयांची सूट उपलब्ध असेल.

टर्म पूर्ण करावी लागेल
या पुनरुज्जीवन मोहिमेअंतर्गत, त्या विमा योजना समाविष्ट केल्या जातील, ज्या पॉलिसीची मुदत पूर्ण करतात आणि प्रीमियम भरण्याच्या निकषांची पूर्तता करतात. एलआयसीने म्हटले आहे की जे ग्राहक काही कारणास्तव वेळेवर प्रीमियम भरू शकले नाहीत त्यांच्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. चालू होणाऱ्या पॉलिसीमध्ये तुम्हाला जुन्याच पॉलिसीचं कव्हर असेल ते मिळणार आहे.

Web Title: revive laps lic policy a chance till october 22 policy started again special revival campaign started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.