Join us  

आरएफआयडीने उपग्रहाद्वारे होणार ई-वे बिलाची निगराणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 3:48 AM

केंद्र सरकारने १ फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीसाठी जीएसटीचे ई-वे बिल बंधनकारक केले आहे. भविष्यात या ई-वे बिलाची निगराणी उपग्रहाद्वारे होऊन माल वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे.

संजय खांडेकरकोला : केंद्र सरकारने १ फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीसाठी जीएसटीचे ई-वे बिल बंधनकारक केले आहे. भविष्यात या ई-वे बिलाची निगराणी उपग्रहाद्वारे होऊन माल वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे. आरएफआयडी काय आहे? रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन डिव्हाईस (आरएफआयडी) ही एक डिजिटल चिप राहणार असून, ती ई-वे बिलासोबत आॅनलाईन मिळणार आहे व हे ई-वे बिल माल वाहतूक करणाºया ट्रकसोबत राहणार आहे.

या ट्रकवर जीएसटी प्रशासन उपग्रहाद्वारे नियंत्रण ठेवणार आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम(जीपीएस)द्वारे हे होणार आहे. ई-वे बिलावर लागलेली डिजिटल चीप जीएसटी अधिकारी जीपीएसद्वारे वाचू शकतील व ट्रक नेमका कुठे उभा आहे, याची माहिती कार्यालयात बसून जीएसटी अधिकाºयांना मिळणार आहे, अशी माहिती जीएसटीचे अभ्यासक व नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे महासचिव संजय अग्रवाल यांनी दिली.आरएफआयडी चिपमुळे कुठला ट्रक कुठून निघाला व तो कुठे जाणार आहे, या माहितीसोबतच ट्रकमध्ये किती माल आहे, कोणत्या क्रमांकाचे ई-वे बिल आहे, हे जीएसटी अधिका-यांना कळणार आहे. त्यामुळे तपासणीसाठी ट्रक थांबविण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे वेळ आणि डिझेलची बचत होईल व माल वाहतूक अधिक वेगाने होईल. याचा फायदा माल वाहतूकदार व व्यापारी दोघांनाही होईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर आरएफआयडी चिप असलेले ई-वे बिल राजस्थानात सुरू आहे. भविष्यात ही प्रणाली देशभर लागू होणार आहे, अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली.

टॅग्स :जीएसटी