Join us

तांदूळ २९, पीठ २७, डाळ ६० रुपये किलो, 'भारत' ब्रँड सर्वच स्वस्तात विकणार, कुठे खरेदी करता येणार? सविस्तर वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 2:55 PM

केंद्र सरकार महागाई विरोधात अनेक योजना लाँच करत आहे.

केंद्र सरकारमहागाई विरोधात अनेक योजना लाँच करत आहे. आता देशातील महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार तांदुळ, डाळ, पीठ स्वस्तात विकणार असून यासाठी आता 'भारत ब्रॅन्ड' सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून देशातील सर्व सामान्यांना तांदुळ २९ रु., डाळ ६० रुपये, पीठ २७ रुपये किलो या दराने मिळणार आहे. 

वाढत्या किमतीवर सरकारने नियंत्रण ठेवले आहे.  भारत तांदूळ, भारत पीठ आणि भारत डाळ बाजारापेक्षा कमी दरात मिळणार आहे. 'भारत आटा' आणि 'भारत डाल'नंतर आता सरकारने 'भारत तांदूळ' २९ रुपये किलोने विकायला सुरुवात केली आहे. जिथे ४० ते ५० रुपये किलोने विकले जात आहे, तिथे तुम्ही भारत तांदूळ २९ रुपयांना विकत घेऊ शकता. तुम्ही हे ५ आणि १० किलोच्या पॅकमध्ये खरेदी करू शकता.

देशात विम्याची पोहोच केवळ ४% लोकांपर्यंत, तरीही यावर १८% GST; संसदीय समितीचाही आक्षेप

भारत ब्रँड अंतर्गत आधी डाळ, नंतर पीठ आणि आता तांदूळ विकण्यास सुरुवात केली आहे. २९ रुपये प्रति किलो दर असलेला भारत तांदूळ दोन टप्प्यात लाँच करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पाच लाख टन तांदूळ दिला जात आहे. तुम्ही ते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडियाकडून खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्ही सेंट्रल स्टोअरमध्येही ते खरेदी करू शकता. याशिवाय सरकार मोबाईल व्हॅनद्वारेही त्याची विक्री करत आहे. सहकारी संस्थांव्यतिरिक्त, भारत आत्ता २००० रिटेल आउटलेटवर देखील उपलब्ध आहे. त्याशिवाय मदर डेअरी, सफाल यांसारख्या आऊटलेट्सवरून तुम्ही ते खरेदी करू शकता.

सध्या ही सुविधा उपलब्ध नाही, मात्र लवकरच ती विकसित केली जाईल. सरकार लवकरच भारत ब्रँडचा तांदूळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विकणार आहे. भारत तांदळा व्यतिरिक्त, तुम्ही आटा २७.५० रुपये प्रति किलोने खरेदी करू शकता. तर भारत डाळमधून ६० रुपये प्रति किलो दराने हरभरा डाळ खरेदी करू शकता.

टॅग्स :सरकारमहागाई