Lokmat Money > बिझनेस न्यूज > तांदळाचा तुटवडा पडणार! १५ वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दर वाढले, जाणून घ्या कारण

तांदळाचा तुटवडा पडणार! १५ वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दर वाढले, जाणून घ्या कारण

आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेत मोठ्या प्रमाणात तांदुळ खातात. पण, आता तांदळाचे दर गगनला भिडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 01:43 PM2023-12-01T13:43:45+5:302023-12-01T13:45:26+5:30

आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेत मोठ्या प्रमाणात तांदुळ खातात. पण, आता तांदळाचे दर गगनला भिडले आहेत.

Rice On The Cusp Of Fresh 15 Year High In After Sharp Rebound | तांदळाचा तुटवडा पडणार! १५ वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दर वाढले, जाणून घ्या कारण

तांदळाचा तुटवडा पडणार! १५ वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दर वाढले, जाणून घ्या कारण

या वर्षी तांदळाचा तुटवडा जगभरात आहे. आशिया, लॅटीन अमेरिकेत आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये तांदुळ हे मुख्य अन्न आहे. यामुळे या देशात तांदळाची मोठ्या प्रमाणात मागणी असते, आता तांदळाच्या किंमती १५ वर्षात पहिल्यांदात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे आशिया आणि आफ्रिकेतील लाखो लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. आशियाई बेंचमार्क थाई पांढरा तांदूळ ५% तुटलेला गेल्या दोन आठवड्यात ५७ डॉलरने वाढला आहे आणि ६४० डॉलर प्रति टन पोहोचला आहे. ऑक्टोबर २००८ पासून ते सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे.

रिझर्व्ह बँकेनं बँक ऑफ अमेरिका, एचडीएफसीसह ५ बँकांना ठोठावला दंड; कारण काय?

ऑगस्टमध्ये, जेव्हा भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली, तेव्हा तांदळाच्या किमती ऑक्टोबर २००८ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. मात्र भारतातून तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने इतर देशांतून विशेषतः थायलंडमधून तांदळाची मागणी वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते ब्राझील आणि फिलिपाइन्ससारख्या देशांतून थाई तांदळाची खूप मागणी आहे. थाई राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष चोकियाट ओफासोंगसे यांच्या मते, देशातील वाढत्या किमती आणि स्थानिक चलन मजबूत झाल्यामुळे तांदळाच्या किमतीत वाढ झाली आहे.

व्हिएतनाममधील तांदळाच्या साठ्यात घट झाल्याचा फायदा थायलंडलाही होत आहे. भारताने जुलैच्या अखेरीस तांदूळ निर्यातीवर बंदी घातली आणि पुढील वर्षी ही बंदी कायम राहण्याची शक्यता आहे. एल निनो प्रभावामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थायलंडमधील भात उत्पादनात यंदा सहा टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे, तर व्हिएतनामने दुष्काळाची भीती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना नवीन पिकांची लागवड करण्यास सांगितले आहे.

Web Title: Rice On The Cusp Of Fresh 15 Year High In After Sharp Rebound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.