भारतात तांदळाचे उत्पादन यंदा घटणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या महत्त्वाच्या पिकाच्या उत्पादनात ५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार या देशातील तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये असमान पावसामुळे यावर्षी भाताच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. राष्ट्रीय भात संशोधन संस्थेने या राज्यांतील भात शेतकऱ्यांना कमी कालावधीतील भात पिकाची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून खराब मान्सूनच्या प्रभावाचा सामना करता येईल आणि भाताच्या विविध जातींचे उत्पादन वाढवता येईल.
बालकांची अनोखी बँक; 17 हजार मुलांचे 16 कोटी रुपये जमा, 6% व्याजही दिले जाते, पाहा...
यंदा कमी पावसामुळे भात पिकाच्या पेरणीवर आणि उत्पादनाच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसू लागल्याने भात उत्पादनाची चिंता वाढली आहे. एल निनो आणि प्रतिकूल हवामानामुळे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जागतिक तांदूळ उत्पादनात अंदाजे ७ मिलियन टन कमी झाल्यामुळे जागतिक तांदळाच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. अशाप्रकारे तांदळाचे उत्पादन कमी असल्याने देशातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही भाव वाढण्याची शक्यता बळावली आहे.
राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेने भात उत्पादक शेतकऱ्यांना कमी कालावधीच्या भाताच्या वाणांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. ९०-११० दिवसांत तयार होणाऱ्या भात पिकाला प्राधान्य द्या, त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले तरी १६० दिवसांत तयार होणाऱ्या भाताच्या तुलनेत या पिकाच्या उपलब्धतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
ओडिशा आणि इतर पूर्वेकडील राज्यांमध्ये कमी पाऊस कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, २०२३ या आर्थिक वर्षात खरीप तांदळाचे उत्पादन ११०.०३२ मिलियन टन इतके होते. पुढील दिवस भात पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार असून येत्या काळात चांगला पाऊस झाल्याने पाणीटंचाईची दरी भरून निघेल, असा विश्वास आयसीएआरने व्यक्त केला आहे. पाऊस चांगला झाला तर भात लावणी आणि पीक तयार करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. ओडिशामध्ये कमी पावसामुळे भात लावणीला आधीच विलंब झाला आहे. देशाच्या पूर्वेकडील अनेक तांदूळ उत्पादक राज्ये कमी पावसामुळे समस्यांना तोंड देत आहेत.
यापुढेही तांदळाचे भाव वाढतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.