Join us

शहरांत श्रीमंत, गावांत गरीब वाढले! चंदीगडमधील नागरिक श्रीमंत; झारखंड, बिहारच्या लोकांकडे पैसाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 7:35 AM

देशातील काही राज्यांमध्ये श्रीमंतांची संख्या प्रचंड वाढली असून, काही राज्यांमध्ये अजूनही लोकांकडे पैसाच नसल्याचे समोर आले आहे.

चंद्रकांत दडसमुंबई :

देशातील काही राज्यांमध्ये श्रीमंतांची संख्या प्रचंड वाढली असून, काही राज्यांमध्ये अजूनही लोकांकडे पैसाच नसल्याचे समोर आले आहे. पंजाब आणि हरयाणाची राजधानी असलेल्या चंदीगड शहरात देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असून, येथे गरीब लोकांचे प्रमाण केवळ १.१ टक्के आहे, तर दुसरीकडे झारखंड, बिहार येथील लोक देशात सर्वाधिक गरीब असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. श्रीमंत असलेल्या राज्यांमध्ये प्रामुख्याने पंजाब, हरयाणा, दिल्ली, गोवा, पुद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे. दिल्लीत ६७.७ टक्के लोकांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असून, केवळ ०.२ टक्के लोक येथे गरीब आहेत. गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या हरयाणामध्येही ४७.७ टक्के लोकांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती एकवटली असून, तेथेही केवळ दोन टक्के लोक गरिबीच्या श्रेणीत येतात. केरळमध्येही केवळ ०.८ टक्के गरीब आहेत.

महाराष्ट्राची स्थिती काय? 

  •  महाराष्ट्र व गुजरात राज्यांत सर्वाधिक संपत्ती असलेल्यांची संख्या जवळपास सारखी आहे. 
  • महाराष्ट्रात हे प्रमाण २७.९ तर गुजरातमध्ये हे प्रमाण २७.४ टक्के आहे. मात्र, महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये गरिबांची संख्या तुलनेत थोडी अधिक आहे. 
  • महाराष्ट्रात ८.६% लोकांकडे संपत्ती कमी असून, गुजरातमध्ये प्रमाण १२.२% इतके आहे.देशाची स्थिती काय?
  • देशातील सर्वाधिक संपत्ती असलेल्यांचे शहरी भागांत सर्वाधिक असून, ते ४५.५% इतके आहे. 
  • ग्रामीण भागात हेच प्रमाण केवळ ८.१% इतके कमी आहे. शहरी भागात गरिबीचे प्रमाण ३.२ टक्के इतके आहे. ग्रामीण भागात गरिबीचे प्रमाण २७.८ टक्के इतके अधिक आहे. 
  • मध्यम प्रमाणात संपत्ती असलेल्यांचे प्रमाण शहरांच्या (१५.५%) तुलनेत ग्रामीण भागात (२२.१%) अधिक आहे. 

गोवा आघाडीवर का? 

गोव्यात प्रमुख व्यवसाय हा पर्यटन असल्याचा फायदा राज्याला झाला असून, तेथील ६१.३ टक्के लोकांकडे सर्वाधिक पैसा आहे, तर केवळ ०.२ टक्के लोकांकडे येथे पैसा नाही. येथे मध्यमवर्गीय नागरिकांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्यांची संख्या वाढली आहे.मध्यमवर्गीय सर्वाधिक कुठे? कर्नाटक, महाराष्ट्र, सिक्कीम, केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या जास्त आहे. हे प्रमाण सरासरी २०-३५ टक्क्यांपर्यंत आहे.

सर्वाधिक संपत्ती असलेली राज्ये७९.४% चंदीगड, ६७.७% दिल्ली, ६०.१% पंजाब, ४७.७% हरयाणा, ६१.३% गोवा,  ४०.१% केरळ, ४५.७% पुद्दुचेरीदेशात श्रीमंत४५% शहरांत, ०८% ग्रामीण भागात गरिबांचे प्रमाण कमी होतेय?काही राज्यांमध्ये गरिबांचे प्रमाण अधिक असले तरी गेल्या काही वर्षांत सातत्याने घट होताना पहायाला मिळत आहे. 

सर्वाधिक गरिबी असलेली राज्येझारखंड ४५.९%बिहार ४२.८% आसाम ३८.१%ओडिसा ३५.१%प. बंगाल ३२.७%मध्य प्रदेश ३१.५गरिबी कोणत्या राज्यांत नाही? लक्षद्वीप ०.१%दिल्ली ०.२%गोवा ०.५%केरळ ०.८%पंजाब १.१%चंदीगड १.१%(गरिबीची आकडे टक्क्यांमध्ये)

टॅग्स :व्यवसाय