अदानी पॉवर ही गौतम अदानी समूहाची कंपनी आता बांगलादेशलावीजपुरवठा करणार आहे. वास्तविक, आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर गौतम अदानी यांनी ट्विटर पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी योजना सविस्तरपणे सांगितली.
अदानी समूहाची पूर्व भारतातील कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पातून बांगलादेशला वीज निर्यात सुरू करण्याची योजना आहे. गौतम अदानी यांच्या मते, झारखंडमधील १६०० मेगावॅटचा गोड्डा वीज प्रकल्प आणि बांगलादेशला समर्पित ट्रान्समिशन लाइन १६ डिसेंबर २०२२ रोजी देशाच्या विजय दिवसापर्यंत कार्यान्वित करण्याची तयारी आहे.
गौतम अदानी यांचा हा प्रकल्प शेजारील देशांमध्ये भारताच्या वाढत्या प्रभावाचे उदाहरण आहे. अदानी समूहाने श्रीलंकेतही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. सध्या गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार गौतम अदानी यांची संपत्ती १४१ अब्ज डॉलर आहे आणि ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.
It is an honour to have met Hon PM of Bangladesh Sheikh Hasina in Delhi. Her vision for Bangladesh is inspirational and stunningly bold.
— Gautam Adani (@gautam_adani) September 5, 2022
We are committed to commissioning our 1600 MW Godda Power Project and dedicated transmission line to Bangladesh by Bijoy Dibosh, 16 Dec 2022. pic.twitter.com/LySohNBSrV
या वृत्तादरम्यान मंगळवारी अदानी पॉवरच्या शेअरमध्ये अपर सर्किट लागलं. कामकाजाच्या अखेरच्या टप्प्यात अदानी पॉवरच्या शेअरचा भाव 5 टक्क्यांनी वाढून ४१० रुपयांवर पोहोचला. कंपनीचे बाजार भांडवल रु १,५८,०५७.३६ कोटी आहे.