इलेक्ट्रॉनिक-सेन्सर बनवणाऱ्या कीन्स कॉर्पचे (Keyence Corp) संस्थापक ताकेमित्सु ताकीझाकी (Takemitsu Takizaki) जपानमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ताकेमित्सु ताकीझाकी यांनी अब्जाधीश ताडाशी यानाई (Tadashi Yanai) यांना मागे टाकत हे स्थान मिळवले आहे.
ब्लूमबर्ग (Bloomberg)बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अब्जाधीश ताकेमित्सु ताकीझाकी यांची संपत्ती 38.2 अब्ज डॉलर्स (2800 अब्ज रुपयांहून अधिक) झाली आहे. कारण, त्याच्या कंपनीचे शेअर्स गेल्या वर्षीच्या सुरुवातीच्या तुलनेत सोमवारी जवळपास दुप्पट झाले होते. तर , ताडाशी यानाई यांची एकूण संपत्ती 35.5 अब्ज डॉलर इतकी राहिली.
ताकेमित्सु ताकीझाकी यांच्याबद्दल बोलयाचे झाल्यास ते कधीच कॉलेजला गेले नाहीत. 76 वर्षीय अब्जाधीश ताकेमित्सु ताकीझाकी यांच्याबाबत ब्लूमबर्गने सांगितले की, त्यांनी कधीही कॉलेजचे शिक्षण घेतले नाही. पण त्यांनी इलेक्ट्रॉनिक-सेन्सरचा शोध लावण्यास मदत केली.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ग्राहकांना #EPF खाते आधार कार्डसोबत लिंक करण्याच्या बाबतीत काही दिलासा दिला आहे. #providentfund#epfo https://t.co/x3JYcWjVnU
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021
ताकेमित्सु ताकीझाकी यांनी 1974 मध्ये कीन्स कॉर्पची स्थापना केली आणि औद्योगिक ऑटोमेशनसाठी सेन्सर, मोजमाप साधने, मशीन-व्हिजन सिस्टीम आणि इतर उपकरणांची निर्मिती केली. 2015 मध्ये कीन्स कॉर्पचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ते आता कंपनीचे मानद अध्यक्ष आहेत.
दरम्यान, कीन्स कॉर्पचे शेअर्स 2020 च्या सुरुवातीपासून सोमवारच्या अखेरीपर्यंत 96% वाढले आहेत, ज्यामुळे कंपनीला सुमारे 167 अब्ज डॉलरचे बाजारमूल्य मिळाले आहे. या अर्थाने, ऑटो जायंट टोयोटा मोटर कॉर्पनंतर जपानमधील ही दुसरी मोठी कंपनी आहे.