Join us

Richest Tea Sellers : सुर्रररर के पियो! चहावाल्यांची कमाई ऐकून तुम्हीही चक्रावून जाल अन् म्हणाल...वाह भाई वाह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 4:53 PM

पाहा किती आहे यांची महिन्याची नक्की कमाई.

तुमच्या ऑफिसबाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर किंवा हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही दिवसातून एकदा तरी चहा पीत असाल. चहा विकून तो कसा तरी आपल्या कुटुंबाचा खर्च भागवत आहे, असा विचार करून तुम्ही त्याला हलक्यातही घेत असाल, तर ही चूक करू नका. गाडीवर 10 रुपये, 20 रुपये चहा विकणाऱ्या व्यक्तीची कमाई लाखोंमध्ये आहे. दररोज 200 ते 250 कप चहा विकून अनेकांना मोठा नफाही मिळतोय. म्हणजेच मोठा पैसा कमावण्यासाठी चहा हा चांगला पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चहा विक्रेत्यांचा परिचय करून देत आहोत, ज्यांची कमाई जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

अनेकदा आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या घोटापासून होते. पण तुम्हाला माहितीये का चहाची विक्री करून किती कमाई होते. चहाचा हा व्यवसाय खूप व्यापक आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हा लोकांचा आवडता स्टार्टअप बनत आहे.

एमबीए चहावालाप्रफुल बिल्लोरला आयआयएम मॅनेजमेंट करायचं होतं. परंतु त्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही. त्यानं त्यानंतर मॅकडोनाल्डमध्ये काम केलं. परंतु त्याचं तिकडंही मन लागलं नाही आणि त्यानं आपलं चहाचं दुकान सुरू केलं. उत्तम कुटुंब आणि पदवीचे शिक्षण घेतलेल्या प्रफुल्लने जेव्हा आपली गाडी सुरू केली तेव्हा एक दिवस तो कोट्यवधींची उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक होईल याची त्याला खात्री नव्हती. कठोर परिश्रमाने प्रफुलने एमबीए चायवाला ब्रँड सुरू केला. आज त्यांची भारतातील 200 हून अधिक शहरांमध्ये आउटलेट आहेत. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांची संपत्ती 5 ते 7 कोटींवर पोहोचली आहे. देशाव्यतिरिक्त आता परदेशातही आउटलेट सुरू झाले आहेत. दर महिन्याला तो 10 ते 15 फ्रँचायझी स्टोअर्स उघडतात. प्रत्येक फ्रँचायझीसाठी तो दरवर्षी 20 लाख रुपये आकारतो. त्याच वेळी, अहमदाबादमधील त्याच्या मूळ स्टोअरची मासिक कमाई 17 लाख रुपये आहे.

चहा विकून 100 कोटींची कमाईअनुभव दुबे यांना कलेक्टर व्हायचे होते, पण यश मिळू शकले नाही. 2016 मध्ये त्यांनी मित्रांसोबत 3 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने चहाचे दुकान सुरू केले आणि आज त्यांची उलाढाल 100 कोटी रुपये आहे. 15 राज्यांतील 165 शहरांमध्ये त्यांची दुकाने आहेत.

पाटण्याचीग्रॅज्युएटचहावालीबिहारची ग्रॅज्युएट चहावाली प्रियांका गुप्ता हिला तुम्ही ओळखत असाल. पाटण्यात चहाचा स्टॉल लावणारी प्रियंका सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. एप्रिल 2022 मध्ये तिने पाटणा येथील महाविद्यालयासमोर तिचा पहिला चहाचा स्टॉल लावला आणि आता ती तिची फ्रँचायझी वितरीत करत आहे. चार महिन्यांत तिची कमाई लाखांवर पोहोचली. 30 हजारांत तिनं चहाचा व्यवसाय सुरू केला होता. 4 महिन्यांत तिचा निव्वळ नफा 1.5 लाखांच्या पुढे गेला. एकेकाळी नोकरी शोधणारी प्रियांका आता डझनभर तरुणांना नोकऱ्या देत आहे.

मॉडेल चहावालीमिस गोरखपूर झालेली सिमरन गुप्ता आता चहाच्या व्यवसायामुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. सिमरन मिस गोरखपूरच्या नावाने नाही, तर मॉडेल चाय वालीच्या नावाने ओळखली जाते. चहाचा स्टॉल लावणारी सिमरन दररोज 200 ते 250 कप चहा 10 रुपयांना विकते. चहाच्या स्टॉलमधून दर महिन्याला सुमारे 75 हजार रुपयांची कमाई होते.

बीटेक चहावालीदिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये बी.टेक.चे शिक्षण घेत असलेल्या वर्तिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. वर्तिका तिचे बी टेक चायवाली नावाचे नवीन स्टार्टअप सुरू करून चांगली कमाई करत आहे. ती दररोज 100 ते 150 कप चहा 20 रुपये, 50 रुपयांना विकते. त्यानुसार एका महिन्यात ती लाखाच्या वर कमाई करते.

टॅग्स :व्यवसाय