Join us

मुकेश अंबानींचा नवा प्लॅन; या कंपन्यांद्वारे 33 हजार कोटी जमा करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 3:50 PM

RIL : रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रिलायन्स बार्कलेज, एचएसबीसी आणि एमयूएफजी बँकेशी विदेशी कर्जासाठी बोलणी करत आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स जिओ विदेशी कर्जदारांकडून 33 हजार कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही कंपन्या विदेशी कर्जासाठी प्रयत्न करत आहेत. या हालचालीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला 12400 कोटी रुपये आणि रिलायन्स जिओला 20600 कोटी रुपये मिळतील. 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या रिपोर्टमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज एक्सटर्नल कमर्शियल बोरोइंग म्हणजेच ईसीबीशी (ECB) संपर्क साधत आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रिलायन्स बार्कलेज, एचएसबीसी आणि एमयूएफजी बँकेशी विदेशी कर्जासाठी बोलणी करत आहे.

विदेशी कंपन्यांशी चर्चाविदेशी कर्ज 5 वर्षांसाठी असू शकते आणि त्याचा रेट सिक्योर्ड ओवरनाइट फायनान्सियल रेटपेक्षा 130 ते 150 बेसिस पॉइंट्स जास्त असू शकतो. या बेंचमार्कवर विदेशी कर्ज उपलब्ध आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजेच आरआयएलची बातचीत बँक ऑफ अमेरिका, सिटीग्रुप, क्रेडिट ऍग्रिकोल, डीबीएस बँक आणि मिझुहो बँक यांच्याशी देखील सुरू आहे. यासाठी रिलायन्सला देशात कोणतीही मंजुरी घ्यावी लागणार नाही, कारण रिझर्व्ह बँकेने 1.5 अब्ज डॉलरपर्यंतच्या कर्जासाठी ईसीबी नियम शिथिल केले आहेत.

जिओ घेऊ शकते 7 वर्षांसाठी कर्जआरआयएलप्रमाणेच रिलायन्स जिओही विदेशी कर्जासाठी कंपन्यांशी चर्चा करत आहे. विदेशी कर्ज घेतल्यानंतर 5G नेटवर्कच्या निधीला गती देण्यासाठी जिओ कंपनी बँक ऑफ अमेरिका, बीएनपी, एचएसबीसी आणि सेसिटी जनरल यांच्यासोबत चर्चा करत करत आहे. जिओला सुरुवातीचे कर्ज मिळाल्यास आणखी कंपन्या आणि बँकांशी पुढील चर्चा केली जाईल. यामुळे कर्जाची रक्कम आणखी वाढू शकते. जिओचे कर्ज 3 ते 7 वर्षांसाठी असू शकते. यासाठी ईकेएन, फिनवेरा सारख्या युरो एक्सपोर्ट क्रेडिट एजन्सी जिओच्या कर्जदारांना गॅरंटी देऊ शकतात.

RIL ची मोठी तयारीरिलायन्स जिओ भारतात 5G नेटवर्क सुरू करण्यासाठी 2 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. या कामात जिओने स्वीडिश कंपनी एरिक्सन आणि फिनलँडची कंपनी नोकियासोबत भागीदारी केली आहे. 5G रोलआउटमध्ये मोठ्या निधीची आवश्यकता आहे, ज्यासाठी विदेशी कर्जाचा विचार केला जात आहे. अलीकडेच, आरआयएलच्या (RIL) एजीममध्ये, कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, पुढील तीन वर्षांत आरआयएल तेल ते रसायन व्यवसायात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

1.1 अब्ज डॉलर कर्ज आरआयएल 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह नवीन कंपनी सुरू करणार आहे, तसेच जुन्या कंपन्यांमध्ये निधीची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे नवीन व्हॅल्यू चेन वाढवण्यासाठी मदत होईल. या वर्षी ऑगस्टमध्ये आरआयएलला देशातील सर्वात मोठी वित्त कंपनी एचडीएफसीने ईसीबीद्वारे 1.1 अब्ज डॉलर कर्ज दिले होते. हे कर्ज आंतरराष्ट्रीय बेंचमार्कपेक्षा 90 बेसिस पॉइंट अधिक दराने दिले आहे. तेव्हापासून कर्जाचे दर झपाट्याने वाढले आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स जिओव्यवसाय