Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोणी नोकरी देता का? देशात वाढली बेरोजगारी, ग्रामीण भागातील स्थिती अधिक चिंताजनक

कोणी नोकरी देता का? देशात वाढली बेरोजगारी, ग्रामीण भागातील स्थिती अधिक चिंताजनक

फेब्रुवारी २०२२ मध्ये देशाचा बेरोजगारीचा दर वाढून ८.१ टक्क्यांवर गेला आहे. हा महागाईचा सहा महिन्यांचा उच्चांक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 07:55 AM2022-03-05T07:55:55+5:302022-03-05T07:57:11+5:30

फेब्रुवारी २०२२ मध्ये देशाचा बेरोजगारीचा दर वाढून ८.१ टक्क्यांवर गेला आहे. हा महागाईचा सहा महिन्यांचा उच्चांक आहे.

rising unemployment in the country the situation in rural areas more worrying | कोणी नोकरी देता का? देशात वाढली बेरोजगारी, ग्रामीण भागातील स्थिती अधिक चिंताजनक

कोणी नोकरी देता का? देशात वाढली बेरोजगारी, ग्रामीण भागातील स्थिती अधिक चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : फेब्रुवारी २०२२ मध्ये देशाचा बेरोजगारीचा दर वाढून ८.१ टक्क्यांवर गेला आहे. हा महागाईचा सहा महिन्यांचा उच्चांक आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी’ या संस्थेच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

सीएमआयईने म्हटले आहे की, फेब्रुवारीमध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर २.५१ टक्क्यांनी वाढून ८.३५ टक्के झाला. याउलट शहरांतील बेरोजगारीचा दर घसरून ७.५५ टक्के झाला. शहरांतील बेरोजगारीचा हा मागील चार महिन्यांचा निचांक आहे.

जानेवारी २०२२ मध्ये हा दर ६.५७ टक्क्यांवर आला होता. मे २०२१ मध्ये बेरोजगारीचा दर ११.८४ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यानंतर मात्र त्यात घसरण सुरू झाली. जानेवारी २०२२ मध्ये हा दर ६.५७ टक्क्यांवर आला होता.  आता तो पुन्हा वाढू लागला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

का वाढतेय बेरोजगारी?

- काही राज्यांत मनरेगाच्या तरतुदीत घट झाली आहे. खेड्यांत बिगर-कृषी क्षेत्रातील नव्या रोजगाराची उपलब्धताही मर्यादित झाली आहे. 

- त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारी वाढून आठ महिन्यांच्या उच्चांकावर गेली आहे. ग्रामीण भागात स्थितीत सुधारणा होऊ शकते. रबी पिकांच्या पेरणीच्या सुरुवातीच्या काळात तेजी पाहायला मिळू शकते. 

- चालू वित्त वर्षात कृषी क्षेत्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी करू शकते. स्थलांतरित मजूर पुन्हा परतू शकतात.

Web Title: rising unemployment in the country the situation in rural areas more worrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.